

CET Exam 2026
ESakal
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सध्या २०२६च्या १७ प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात पदवी अभ्यासक्रमाच्या १२ प्रवेश परीक्षा, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पाच प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत.