खेलेगा इंडिया... : घोट्याच्या दुखापती

घोट्याच्या दुखापती अनेक लोकांना रोजच्यारोज होऊ शकतात. विशेषतः: व्यायाम किंवा ॲथलेटिक्सशी संबंधित कोणत्याही कृती दरम्यान. परंतु घोट्याच्या सर्व दुखापती सारख्या नसतात.
Ankle injuries
Ankle injuriessakal
Summary

घोट्याच्या दुखापती अनेक लोकांना रोजच्यारोज होऊ शकतात. विशेषतः: व्यायाम किंवा ॲथलेटिक्सशी संबंधित कोणत्याही कृती दरम्यान. परंतु घोट्याच्या सर्व दुखापती सारख्या नसतात.

- महेंद्र गोखले

घोट्याच्या दुखापती अनेक लोकांना रोजच्यारोज होऊ शकतात. विशेषतः: व्यायाम किंवा ॲथलेटिक्सशी संबंधित कोणत्याही कृती दरम्यान. परंतु घोट्याच्या सर्व दुखापती सारख्या नसतात. काही किरकोळ असतात, काही सौम्य असतात आणि काही मोठे नुकसान करतात. आपण सर्वांना त्रास होणाऱ्या घोट्याच्या दुखापतींची माहिती घेऊयात.

घोट्याच्या दुखापती

1) घोट्याला आतल्या बाजूला लचक भरणे - आपला घोटा किंवा आतील बाजूस वळतो तेव्हा आपल्याला लचक भरते.आपला पाय त्या दिशेने फिरतो, तेव्हा तुमच्या घोट्याच्या बाहेरील त्या बाजूकडील लिगामेंट ताणले जातात. खरतर घोट्याच्या सर्व दुखापतींपैकी अंदाजे ८० ते ९० टक्के दुखापती ही अशा प्रकारची लचक असते.

2) घोट्याला बाहेरच्या बाजूने लचक भरणे - ही वरील स्थितीच्या बरोबर विरुद्ध असते. या प्रकारच्या लचकण्यामध्ये आपला पाय बाहेरून वळतो. अशा दुखापतीमुळे आपल्या घोट्याच्या आतील अधिक स्थिर असलेले लिगामेंट, मध्यवर्ती आणि डेल्टॉइड लिगामेंटवर परिणाम होतो. घोट्याच्या लचक भरणे या प्रकारांपैकी फक्त १०-२० टक्के एव्हर्शन स्प्रेन्स म्हणून वर्गीकृत केले जातात आणि अनेकदा ते आतल्या बाजूच्या लचक भरण्यापेक्षा जास्त गंभीर असतात.

3) घोट्याच्या वरती लचक भरणे - या दुखापतीमध्ये पायाच्या खालच्या भागात टिबिया आणि फायब्युला जोडणाऱ्या घोट्याच्या वरच्या भागाला लचक भरण्याचा समावेश होतो. घोट्याच्या मागच्या भागात लचक भरली म्हणजे पायाचा खालचा भाग आणि पाऊल बाहेरच्या बाजूने वळतात, तेव्हाच घोट्याच्या वरच्या भागात लचक भरते. या जखमांवर उपचार करण्यासाठी विश्रांती, बर्फ, कॉम्प्रेशन आणि एलिव्हेशन हे सर्वोत्तम मार्ग आहेत.

4) घोट्याचे फ्रॅक्चर - यामध्ये घोट्याच्या सांध्यातील एक किंवा अधिक हाडे मोडणे यांचा समावेश होतो. या दुखापती एका लहान हाडाच्या तुटणे, ज्यामुळे आपले चालणे थांबत नाही, यापासून मोठ्या किंवा एकापेक्षा जास्त फ्रॅक्चरपर्यंत दुखापत असू शकते. अशा वेळी ही दुखापत ठीक करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यक असू शकते. अनेकदा घोट्याच्या फ्रॅक्चरमध्ये घोट्याची हाडे आणि सांधे जोडून ठेवणाऱ्या लिगामेंटला दुखापत होते. आपल्याला आपल्या फ्रॅक्चरसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास, आपल्या रोजच्या हालचाली करण्याची परिस्थिती परत येण्यासाठी सामान्यतः ३-४ महिने लागतात, परंतु खेळाच्या कृती करण्यासाठी परत येण्यास जास्त वेळ लागू शकतो.

5) घोट्याचे डिसलोकेशन - घोट्यावर अचानक खूप जास्त ताण किंवा दबाव पडल्यास त्याला गंभीर दुखापत होते आणि घोटा नेहमीपेक्षा किंवा प्रमाणाबाहेर हलतो. अशी दुखापत गंभीर स्वरूपाची असते आणि त्यामध्ये घोट्याची एक किंवा अधिक हाडे फ्रॅक्चर होतात. घोट्याच्या अशा दुखापतीला पूर्ववत करण्यासाठी आवश्यक शस्त्रक्रियेमध्ये प्लेट्स आणि स्क्रू वापरले जातात.

घोट्याच्या दुखापतीनंतर पुन्हा नियमित हालचाल आणि कृती करणे महत्त्वाचे आहे.

  • सूज असल्यास बर्फ आणि कॉम्प्रेशन.

  • प्रॉप्ससह वजन विरहित स्टँबिलिटीचे व्यायाम.

  • वजन सहन करण्याचे स्टँबिलिटीचे व्यायाम.

  • घोट्याला हळूहळू लोड करणे

  • पुढे, चालणे, जॉगिंग तंत्र सुधारण्यासाठी प्रॉप्स वापरणे

  • मुख्य कोरवर काम करा.

  • हार्ड जमिनीवर चालणे, पळणे, खेळणे किंवा दोरीवरच्या उड्या मारणे टाळा.

  • शरीराचे वजन कमी करण्याकडे लक्ष द्या.

  • वारंवार अशी दुखापत टाळण्यासाठी घोट्याचे स्ट्रेंग्थ, लवचिकता, आणि समतोल साधणारे व्यायाम करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com