
नवोदित खेळाडूंबरोबर काम करणारे प्रशिक्षक त्यांच्या ट्रेनिंग आणि स्पर्धांद्वारे मुलाच्या भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या कामगिरीवर प्रभाव पाडू शकतात, त्यांचा पाया तयार करण्याची वर्षे असतात ती बालपणीची.
खेलेगा इंडिया... : नवोदितांना प्रशिक्षण देताना
- महेंद्र गोखले
नवोदित खेळाडूंबरोबर काम करणारे प्रशिक्षक त्यांच्या ट्रेनिंग आणि स्पर्धांद्वारे मुलाच्या भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या कामगिरीवर प्रभाव पाडू शकतात, त्यांचा पाया तयार करण्याची वर्षे असतात ती बालपणीची. तो काळ निरागस असतो त्या काळात खेळाडूला आवश्यक ते प्रशिक्षण मिळावे आणि त्यासाठी प्रशिक्षकाच्या ज्ञानाचा, त्याच्या दृष्टिकोनाचा आणि अनुभवाचा फायदा मुलांना मिळावा.
मनातील निकालापासून सुरुवात
सामान्य शारीरिक कौशल्य विकासापासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणात नवोदित खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतात. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ॲथलिट ॲरोबिक कंडिशनिंग, समन्वय, गतिशीलता, लवचिकता ही मूलभूत कौशल्ये आत्मसात करून मजबूत पाया तयार करतात. या नवोदित ॲथलीट्सना क्रॉस-ट्रेनिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांना सामान्य ॲथलेटिसिझमपासून दर्जेदार आणि विशिष्ट क्रीडा प्रकारासाठी आवश्यक कौशल्ये असलेले खेळाडू म्हणून घडवले जातात. हे नवोदित ॲथलिट्स फिटनेसचे तंत्र, जे पूर्वी त्यांना आवश्यक वाटले नसेल, ते आत्मसात करण्यासाठी देखील प्रयत्नशील असतात. यामध्ये समतोल, लवचिकता, वेग, सामर्थ्य आणि टिकून राहण्याची क्षमता यासारख्या कौशल्यांचा समावेश होते ज्यामुळे कालांतराने हे खेळाडू प्रगती करू शकतात.
उत्तम प्रशिक्षक शिस्तप्रिय शैलीपेक्षा संयमाला प्राधान्य देतो. ते खेळाडू दाखवत असलेल्या सकारात्मक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करतात, तरुण खेळाडूंना मौजमजा करण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि जिंकण्याचे महत्त्व कमी कसे करायचे तसेच पराभव कसा स्वीकारायचा हे शिकवतात.
प्रत्येक निष्ठावान खेळाडू प्रशिक्षण देऊ शकत नाही. अनेक व्यावसायिक खेळाडूंना स्पर्धात्मक खेळ खेळण्याचा नक्कीच अनुभव असतो. परंतु प्रशिक्षणाचा अनुभव असेलच असे नाही, तसेच त्यांच्यामध्ये नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक कौशल्ये नसतील. संवेदनशील असणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असू शकते.
प्रत्येक निष्ठावान पालक मुलांना प्रशिक्षण देण्यात उत्कृष्ट कामगिरी करू शकत नाहीत. प्रत्येक सराव आणि स्पर्धेला हजेरी लावणारे पालक मुलांना प्रशिक्षण देतात. त्यांचा हेतू प्रामाणिक असला तरी ते अनेकदा योग्य प्रशिक्षण, त्याचे मूल्यांकन आणि त्याची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाच्या चुका करतात. एखाद्या खेळाबाबत निष्ठा असली तरी ती निष्ठा अनुभव, तांत्रिक कवायती, पोषण नियोजन आणि क्रीडा मानसशास्त्र याची जागा घेऊ शकत नाही.
अति-महत्त्वाकांक्षी प्रशिक्षकांमुळे अनेकदा खेळाडूंना बर्नआउट होतो. अति-महत्त्वाकांक्षी प्रशिक्षक लगेचच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करतो आणि अनेकदा मुलाच्या वयाकडे दुर्लक्ष करतो. नवोदित खेळाडू त्यांचा खरा खेळ दाखवेपर्यंत त्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे, थोडे सबुरीने घेतले पाहिजे आणि हे करण्याचा दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. तसेच त्यांना आधार, विश्वास आणि सुरक्षित वाटले पाहिजे आणि त्यातूनच त्यांचा नवनवीन अनुभव घेण्याचा मार्ग मोकळा होईल.
स्वतःची स्वप्ने मुलांकरवी पूर्ण करण्याचा पालकांचा अट्टहास असतो. आपल्या लहान वयात जे करायला किंवा खेळायला मिळाले नाही ते आपल्या मुलांनी मिळवावे याकडे पालकांचा जास्त कल असतो. असे पालक स्वत:ला ‘स्पर्धेत सहभागी’ करून घेतात, तेव्हा मुलांना, खेळाडूंना त्यांच्या क्षमतेपेक्षा किंवा इच्छांच्या पुढे जाऊन कामगिरी करण्याचा दबाव जाणवतो. निष्णात प्रशिक्षकाला हे लगेच ओळखता येते आणि तो या परिस्थितीमध्ये योग्यरीत्या हस्तक्षेप करून खेळाडूला शारीरिक किंवा भावनिक दुखापत होण्यापासून वाचवतो.
Web Title: Mahendra Gokhale Writes India Play Training Sports
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..