
Mahila Kisan Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली महिला किसान योजना आता राज्य सरकारने राबवायला सुरु केली आहे. आजच्या काळात शेती ही केवळ पुरुषांची जबाबदारी राहिलेली नाही. अनेक महिला शेतकरी देखील खांद्याला खांदा लावून शेतीची कामं करत आहेत. निंदणीपासून ते कापणीपर्यंत आणि त्यापुढे शेतीपूरक व्यवसायांपर्यंत महिलांची भूमिका आता महत्त्वाची बनली आहे.