दिग्गज आयटी कंपन्यांची साडेचार लाख कर्मचारी भरतीची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IT Company

नव्या वर्षात देशातील आयटी क्षेत्रात साडेचार लाखांहून अधिक नोकरीच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

दिग्गज आयटी कंपन्यांची साडेचार लाख कर्मचारी भरतीची तयारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नव्या वर्षात देशातील आयटी क्षेत्रात साडेचार लाखांहून अधिक नोकरीच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. याची तयारी आयटी इंडस्ट्रीकडून सुरूअसून २०२२ च्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीपर्यंत साडेचार लाख नोकऱ्या निर्माण होतील असं Unearthinsight ने म्हटलं आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी ही नोकरभरतीमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांचे प्रमाण जास्त असणार आहे. तसंच फ्रेशर्ससाठीसुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त संधी असेल.

पुढच्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत १७ ते १९ टक्क्यांनी कर्मचारी भरतीत वाढ होईल. आयटी क्षेत्रात यामुळे जवळपास १ लाख ७५ हजार कर्मचाऱ्यांची वाढ होईल. देशात ३० पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यांनी आतापर्यंतच्या आर्थिक वर्ष २०२२ मध्ये अडीच लाख नोकऱ्या मिळाल्या आहेत.

नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये ज्या पाच कंपन्यांमध्ये सर्वाधिक फ्रेशर्सना संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, कॉग्निझंट, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक्नॉलॉजी यांचा समावेश असणार आहेत. यात टाटा कन्सल्टन्सी ७७ हजार फ्रेशर्सना संधी देऊ शकते. यात पहिल्या टप्प्यात ४३ हजार आणि दुसऱ्या टप्प्यात ३४ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. तर कॉग्निझंट आणि इन्फोसिस प्रत्येकी ४५ हजार फ्रेशर्स घेऊ शकते. याशिवाय टेक महिंद्रामध्ये १५ हजार फ्रेशर्सना संधी मिळण्यीच शक्यता आहे. तर एचसीएल टेक्नॉलॉजीज २०२२ च्या आर्थिक वर्षात २२ हजार आणि पुढच्या आर्थिक वर्षात ३० हजार नियुक्त्या करू शकते.

हेही वाचा: 'येथे' निघाली 1000 लॅब टेक्‍निशियनची भरती! जाणून घ्या सविस्तर

बहुतांश आय़टी कंपन्या या अपस्किलिंगवर लक्ष केंद्रीत करत आहेत. टीसीएसने iON लर्निंग प्लॅटफॉर्मचा वापर करत लर्निंग टूलचा वापरून कर्मचाऱ्यांच्या रिस्किलिंगसाठी पाऊल टाकले आहे. तर इन्फोसिस LEX च्या माध्यमातून त्यांच्या कर्मचाऱ्यांना रिस्किलिंग आणि अपस्किलिंगसाठी प्रोत्साहन देत आहे. गेल्या १२ महिन्यात २०२२ च्या आर्थिक वर्षाच्या अर्ध्या कालावधीत झालेल्या नियुक्त्यांचे प्रमाण हे १७ ते १९ टक्के जास्त असण्याची अपेक्षा आहे. तर पुढच्या आर्थिक वर्षात हेच प्रमाण १६ ते १८ टक्क्यांच्या दरम्यान राहील असा अंदाज आहे.

Unearthinsight ने असंही म्हटलं आहे की, २०३० पर्यंत आयटी क्षेत्रातील उद्योगासाठी जवळपास ८० ते १०० अब्ज डॉलर्स इतका क्लाउड सर्विसमधून उत्पन्नाचा अंदाज आहे. Accenture सारख्या कंपन्या यासाठी पढाकार घेत असून त्यांनी क्लाउड इंडस्ट्री एक्स आणि सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली आहे.

इन्फोसिसने गेल्या दोन वर्षात डिजिटल ट्रान्सफर्मेशन प्रोजेक्टे स्केलसाठी वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या डीलमध्ये वाढ केली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजी Amazon Web Services (AWS) बिझनेस युनिटसाठी 10 हजार नियुक्त्या करेल अशी अपेक्षा आहे. तर Wipro ने फुल स्ट्राइड क्लाउड सर्व्हिसेस लाँच केल्या आहेत.

loading image
go to top