esakal | व्हा लॅब टेक्निशिअन; वैद्यकीय उपचारांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

व्हा लॅब टेक्निशिअन; वैद्यकीय उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका

व्हा लॅब टेक्निशिअन; वैद्यकीय उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : वैद्यकीय उपचारांमध्ये लॅब टेक्निशिअनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. रुग्णाची लघवी, रक्त आदींची तपासणी करून लॅब टेक्निशिअन रिपोर्ट बनवतो. आता निरनिराळे बॉडी फ्ल्यूड म्हणजे लाळ किंवा वेगळ्या प्रकारचे टिश्यूज यांचीही चाचणी घेतली जाते. त्या व्यतिरिक्त डी.एन.ए. चाचणीसुद्धा घेतली जात आहे. म्हणजे लॅब टेक्निशिअनच्या कामाचा व्याप खूप वाढला आहे. लॅब टेक्निशिअन्सचा अभ्यासक्रम विविध ठिकाणी उपलब्ध होत आहे. (Make-a-career-as-a-lab-technician-nad86)

लॅब तंत्रज्ञ हा रुग्णालयात किंवा खाजगी वैद्यकीय निदान प्रयोगशाळेतील रुग्णांकडून त्वचा आणि शारीरिक द्रवपदार्थाच्या नमुन्यांसह नमुने गोळा करून प्रक्रिया करीत असतो. नमुन्यांचे रासायनिक विश्लेषण करण्यासाठी डॉक्टरांच्या लॅब मॅनेजरच्या किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली काम करतो. हे विश्लेषण वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे रोगांचे निदान आणि उपचारांच्या योजनांसाठी वापरले जात असतात.

हेही वाचा: ‘...अन्यथा तुझ्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकून देईल’

डीएमएलटी हा पॅरामेडिकल कोर्स आहे. हा कोर्स दोन वर्षांचा आहे. बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला या पदविकेसाठी अर्ज करता येतो. ‘डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी’ (डीएमएलटी) असे त्याचे नाव आहे. यामध्ये ३० टक्के थिअरी आणि ७० टक्के प्रॅक्टिकल अशी विभागणी करण्यात येते. हे प्रॅक्टिकल त्या रुग्णालयासोबतच विविध प्रकारच्या प्रयोगशाळांमध्ये करायला मिळते. त्यासाठी विद्यार्थ्यांना हिस्ट्रो पॅथॉलॉजी, क्लिनिकल मायक्रो बॉयोलॉजी आणि बॉयो केमिस्ट्री लॅबमध्ये पाठवले जाते. काहीवेळा रक्तपेढ्यांमध्येही काम करता येते. पदविका मिळाल्यानंतर नामवंत लॅबमध्ये चांगली संधी मिळते. या कोर्ससाठी फी खूप कमी आहे.

डीएमएलटी कोर्समध्ये बारावीच्या गुणांवर प्रवेश दिला जातो. काही कॉलेज प्रवेश परीक्षा घेऊ शकते. प्रवेश परीक्षेच्या आधारे मेरिट लिस्ट लागेल. प्रवेश परीक्षा खूप कमी कॉलेज घेतात. काही कॉलेज दहावी नापास विद्यार्थ्यांना देखील प्रवेश देतात. काही कॉलेजमध्ये प्रवेशासाठी दहावीमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे.

हेही वाचा: सुक्या मेव्याचा राजा अशी काजूची ओळख; हे आहेत फायदे

काही कॉलेज

 • सबअर्बन कॉलेज ऑफ पॅरामेडिकल एज्युकेशन, मुंबई

 • ओऍसिस कॉलेज ऑफ ससान्स ॲॅण्ड मानजमेंट, पुणे

 • दम्यानी डीएमएलटी इन्स्टिट्यूट, ठाणे

 • बेस्ट कॉलेज - डीएमएलटी

 • बंगलोर मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर

 • आदर्श पॅरामेडिकल कॉलेज, अमृतसर

 • एरा मेडिकल कॉलेज, लखनऊ

 • तीर्थंकर महावीर विद्यापीठ, मुरादाबाद

 • गंगाशील मेडिकल कॉलेज, बरेली

 • मेडिकल कॉलेज, औरंगाबाद

 • राममूर्ती मेडिकल कॉलेज, बरेली

 • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमृतसर

 • रुहेलखंड मेडिकल कॉलेज, बरेली

 • बरुण अर्जुन मेडिकल कॉलेज, शाहजहांपूर

 • ओम साई पॅरामेडिकल कॉलेज, हरियाणा

 • आयुष्मान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड नर्सिंग, राजस्थान

 • आदर्श पॅरामेडिकल संस्था, महाराष्ट्र

(Make-a-career-as-a-lab-technician-nad86)

loading image