

MentalHealth
Sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
दिवसेंदिवस वाढत चाललेले आय. टी. क्षेत्रातील ताणतणाव आता गंभीर स्वरूप धारण करत चाललेत. सकाळी लवकर जायचं, रात्री उशिरापर्यंत थांबायचं, डेडलाइन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे स्वतःला अपडेट ठेवायला लागणं, रात्री उशिरापर्यंत काम करावं लागणं, पुढे जाण्यासाठीची जीवघेणी धडपड आणि त्यासाठी प्रसंगी तब्येतीची आणि निकोप नात्यांमधली हेळसांड हे विलक्षण दुष्टचक्र आहे. हे आवश्यक म्हणायचं की अपरिहार्य हा गंभीर प्रश्न झालाय. यामध्ये तरुण भरडले जातायत. महाविद्यालयीन विद्यार्थी, युवर अस्वस्थतेच्या आणि निराशेच्या आजाराचे बळी ठरलेले दिसतात. यासाठी वैयक्तिक अस्वस्थतेची कारणं शोधायला हवी होती. प्रामुख्याने बाह्य परिस्थितीजन्य आणि आंतरिक जैविक, स्वभावजन्य कारणांचा मागोवा घेऊन त्यावरील उपाय करायला हवे होते. युवकांशी बोलताना अनेक गोष्टी समोर येतात