

Manasved: Tamaso Ma Jyotirgamay – Embracing a Positive Outlook on Life by Dr. Vidyadhar Bapat
Sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या बृहदारण्यक उपनिषदातील प्रार्थनेतील ओळीचे सूत्र धरून जायचं तर आपल्याला सर्वार्थाने अंधारातून प्रकाशाकडे जायचंय. म्हणूनच सातत्यानं जीवनाच्या चांगल्या, प्रकाशमय अशा बाजूकडे आपल्याला पहायला हवं. चांगलं तेच घडेल हा दृष्टिकोन कुठल्याही परिस्थितीत, अगदी विपरीत परिस्थितीतही ठेवायला हवा. त्यासाठी आपल्या मनाचं, विचारसरणीचं ‘प्रोग्रॅमिंग’, आपला दृष्टिकोन सातत्यानं सकारात्मक असावा. आपला आयुष्याकडे, एकूणच जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तरच आयुष्याकडून आपल्याला भरभरून आनंद, सुख, मनःशांती आणि यश मिळत जातं. अर्थपूर्ण आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता असते. सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही जीवनाची चांगली बाजू पाहता. उत्साही राहता आणि चांगलं तेच घडेल अशा धारणेने जगता.