

The Dopamine Drop: Understanding the Psychological Reason Behind Screen-Time Tantrums
sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
आपण मागील भागात मुलांमधील मोबाईल वापराच्या व्यसनाबद्दल माहिती घेतली. यासाठी पालकांनीही काही नियम पाळण्याची आवश्यकता आहे.
पालक नियंत्रण सुरू करा : स्क्रीन वेळ मर्यादित करण्यासाठी ‘गुगल फॅमिली लिंक किंवा ॲपल स्क्रीन टाइम यासारख्या टूल्सचा वापर करा.
स्क्रीन-मुक्त क्षेत्र बनवा ः जेवणाचे टेबल आणि चालत्या गाडीमध्ये मोबाईल किंवा इतर उपकरणांचा वापर पूर्णपणे बंद करा.
स्वतः आधी आचरण करा ः मुलांशी बोलताना किंवा सकाळी झोपेतून उठल्या उठल्या स्वतः मोबाईल पाहणे टाळा.