

Simple daily habits like meditation, yoga, music, and emotional awareness can significantly reduce stress and strengthen mental health.
Sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
ताणतणावावर उपाय निश्चितच आहेत. प्रथम एक गोष्ट मान्य करूयात की, बाह्य परिस्थिती अशीच राहणार किंवा दिवसेंदिवस अधिक बिकट होत जाणार. त्याला तोंड देण्यासाठी आपण आतून शांत, कणखर, स्वस्थ व्हायला हवं. कसं?
१. ‘बाह्य’ वातावरण कसंही असो आपण ‘आतलं’ वातावरण बदलायला हवं. त्यासाठी काही गोष्टी शिकायला हव्यात. बदलायला हव्यात. थोडक्यात मेंदूच्या (मनाच्या) कार्यपद्धतीत बदल करून नव्याने तयार करायला हवं.
२. तणाव नियोजनाच्या पद्धती शिकून घ्यायला हव्यात. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व, आनुवंशिक गुण, स्वभाव, मेंटल मेकअप वेगळा असतो. त्यामुळे तणाव नियोजनाच्या पद्धतीही वेगळ्या असू शकतात.