

Emotional Balance and Personality Development
sakal
डॉ. मिलिंद नाईक, प्राचार्य, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला
भारतीय तत्त्वज्ञानानुसार मानवी व्यक्तिमत्त्व पाच कोशांनी बनलेले मानले जाते. अन्नमय आणि प्राणमय कोशानंतर येणारा तिसरा स्तर म्हणजे मनोमय कोश. हा कोश मन म्हणजेच संवेदना, भावना आणि कल्पना - विचारांशी संबंधित आहे.
विरजा मंत्रात म्हटले आहे ः
ॐ शब्द, स्पर्श, रूप, रस,
गंधा मे शुद्ध्यन्ताम् ।
पाच ज्ञानेंद्रियांमुळे मिळणाऱ्या संवेदना आपल्याला ज्यांद्वारे जाणवतात ते म्हणजे मन! कान, त्वचा, डोळे, जीभ व घ्राणेंद्रिय या पाच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व संवेदना मनाच्या साहाय्यानेच अनुभवता येतात. मन सजग, एकाग्र आणि स्थिर असेल तर इंद्रियांच्या साहाय्याने मिळणाऱ्या संवेदनांची जाणीव होते, व्यक्तीचे हे अनुभव अधिक स्पष्ट आणि अर्थपूर्ण होतात. मनाच्या एकाग्रतेचा संवेदन अथवा ज्ञान ग्रहण करण्यावर परिणाम होतो. मन अस्थिर असल्यास संवेदनांची जाणीवही विस्कळित होते.