Polytechnic Admission: पॉलिटेक्निकचे आता चौथ्या फेरीतील प्रवेश; तिसऱ्या फेरीअखेर ७१ टक्के निश्चित
Fourth Round Admission Polytechnic : मराठवाड्यातील ६८ पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील १,६४६ जागांसाठी चौथ्या फेरीचे जागा वाटप जाहीर झाले आहे. यावर्षीच्या दाखल्यांमध्ये २ हजार ९१० जागांची वाढ झाली असून, प्रवेश निश्चितीला सुरूवात झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : पॉलिटेक्निकच्या चौथ्या फेरीसाठी मंगळवारी (ता. पाच) जागा वाटप जाहीर झाले. मराठवाड्यातील ६८ पॉलिटेक्निकमधील १,६४६ जागांसाठी यादी जाहीर झाली. त्यातील ४६८ जागांचे वाटप मराठवाड्यातील दहा शासकीय तंत्रनिकेतनमधील आहे.