- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
दोस्तांनो, आजचा विषय आहे ‘अर्थ.’ म्हणजे दोन्ही अर्थाने! ‘शब्दांचे अर्थ शब्दकोशात बघण्याची सवय’ आणि ‘पैसे योग्य प्रकारे हाताळण्याची सवय.’ ही दोन कौशल्ये आपल्याजवळ असणं हीच खरंतर एक संपत्ती आहे. या दोन सवयी शालेय वयातच कमावल्या गेल्या पाहिजेत. हो मी मुद्दाम म्हणते की, ‘कमावल्या’ पाहिजेत.