Mechanical Engineering

Mechanical Engineering

sakal

Mechanical Engineering : यांत्रिकी अभियांत्रिकी स्वप्नांना वास्तवात बदलणारी शाखा

Engineering jobs : यांत्रिकी अभियांत्रिकी हे उद्योग, वाहतूक, ऊर्जा आणि सरकारी क्षेत्रात दीर्घकालीन व स्थिर करिअर संधी देणारे महत्त्वाचे क्षेत्र आहे.
Published on

प्रा. प्रतीक्षा वाघ - अभियांत्रिकी संशोधक

यांत्रिकी अभियांत्रिकी ही आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या यंत्रे आणि यांत्रिक प्रणालींशी संबंधित अभियांत्रिकी शाखा आहे. यामध्ये इंजिन, वाहने, उपकरणे, यंत्रसामग्री आणि ऊर्जा प्रणाली यांची रचना करणे, तयार करणे आणि देखभाल करणे यावर भर दिला जातो. प्रत्यक्ष जीवनातील समस्यांचे व्यावहारिक समाधान देत असल्यामुळे तसेच करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने अनेकजण यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड करतात. यांत्रिकी अभियंत्याला ठराविक उद्योगापुरते मर्यादित राहावे लागत नाही. हे करिअर लवचिक आणि दीर्घकाळ टिकणारे ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com