Medical Admission: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची दुसरी फेरी सुरू

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Medical Student
Medical StudentSakal

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) देण्यात आली आहे. (Medical Admission Updates)

राज्य सीईटी सेलने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियेतील पहिला फेरी ९ फेब्रुवारीला पूर्ण झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीतंर्गत प्राधान्यक्रम निवडीचा पर्याय देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान जाहीर केली जाणार आहे. या यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

Medical Student
किरिट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण; सुरक्षा रक्षक निलंबीत, ३३ जणांच्या बदल्या

त्याचप्रमाणे ‘आयुष’ अंतर्गत अभ्यासक्रमाच्या बीएचएमएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बी.एस्सी नर्सिंग, बीओटीएच, बीएएसएलपी/बी आदी पदवी अभ्यासक्रमांची पहिली प्रवेश यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात १६ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. तर, दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान प्राधान्यक्रम देता येणार आहे. या फेरीची गुणवत्ता यादी २५ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत जाहीर केली जाणार असून यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १० मार्चपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेतील वेळापत्रकानुसार गुणवत्ता यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क भरून प्रवेश घ्यायचा आहे. याबाबत अधिक माहिती सीईटी सेलच्या ‘https://cetcell.mahacet.org/’ संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com