जिद्दीला सलाम ! इस्लामपूरच्या मीनलने केले आईवडिलांच्या कष्टाचे चिज

आयएफएस परीक्षेत देशात पटकावला २६ वा क्रमांक
Meenal Sawant
Meenal SawantSakal

इस्लामपूर (सांगली) : रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे वडील आणि शिवणकाम करून त्यांना हातभार लावणारी आई यांच्या कष्टाचे चीज करत, इस्लामपूरच्या (Islampur) मीनल महादेव सावंत (Meenal Sawant)हिने इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) (IFS Exam)परीक्षेत देशात २६ वा क्रमांक पटकावला आहे. आता सुपर क्लास वन अधिकारी म्हणून ती पदभार स्वीकारणार आहे.

Summary

स्वतःलाच आव्हान देत सलग दुसऱ्यांदा हीच परीक्षा तीने दिली.

मीनल हिचे हे सलग दुसरे यश आहे. तिने यापूर्वी २०१९ मध्ये याच परीक्षेत यश मिळवले होते. त्यावेळी तिने भारतात ४७ वा क्रमांक मिळवला होता. मात्र तिने स्वतःलाच आव्हान देत सलग दुसऱ्यांदा हीच परीक्षा दिली, आणि यावेळीही तिने स्वतःला सिद्ध करत २६ वा क्रमांक मिळवला.

मीनलने इस्लामपूरमधील मालती कन्या, विद्यामंदिर हायस्कूल, त्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठ, आयआयटी- मुंबई याठिकाणी शिक्षण घेतले आहे. मधल्या काळात तिने पाच वर्षे दिल्ली येथे नोकरीही केली. त्यानंतर ठाणे येथे दुसऱ्या एका नोकरीत असतानाच तिचे बारामतीजवळील काटे येथील एका युवकाशी लग्न झाले.

Meenal Sawant
Fitness Freak Faral : दिवाळीत बनवा डायट स्पेशल ड्रायफ्रूट्स लाडू

लग्नानंतर २०१८ मध्ये नोकरी सोडून देत सांसारिक जबाबदारी सांभाळत तिने ‘आयएफएस’ची अत्यंत कठीण असणारी परीक्षा दिली. विशेष म्हणजे कोणताही क्लास न लावता तिने या परीक्षेचा अभ्यास केला. आई वडिलांचे कष्ट आणि पतीचा विश्वास सार्थ ठरवत मीनल हिने मिळवलेले हे यश इस्लामपूर शहर आणि वाळवा तालुक्यात गौरवास्पद कामगिरी ठरली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com