मानसिक खंबीरता

मनाचा खंबीरपणामुळे सामान्य आणि असामान्य माणूस यातील फरक वेगळा पाहता येतो.
Mental Resilience Building Strength

Mental Resilience Building Strength

sakal

Updated on

- विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

मनाचा खंबीरपणामुळे सामान्य आणि असामान्य माणूस यातील फरक वेगळा पाहता येतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आव्हानात्मक परिस्थिती अनेक वेळा येते, तसेच प्रत्येकाला अपयशाला तोंड द्यावे लागतेच. अपयश हे कोणत्याही प्रकारचे असू शकते (परीक्षेमध्ये कमी मार्क पडणे, खेळामध्ये महत्त्वाच्या वेळी परफॉर्मन्स न होणे, नातेसंबंध तुटणे, नोकरीत अपेक्षित यश न येणे इत्यादी) आणि अशा वेळेस आपल्या मानसिक खंबीरतेची परीक्षा घेतली जाते. तुम्ही जेवढे खंबीर राहाल, तेवढे तुम्ही अशा परिस्थितीतून लवकर बाहेर याल व परत नव्याने पुढे प्रगती कराल. या उलट कमकुवत मनाचा माणूस यातून लवकर बाहेर येत नाही व काही वेळा तर तिथूनच प्रगतीची वाटचाल खुंटते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com