

Train your mind to face life with confidence.
Sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
आपण मागील काही भागांत सकारात्मक विचार कसा करायचा याची माहिती घेतली. संशोधनाअंती सकारात्मक विचारसरणीचे फायदे लक्षात आले आहेत.
१ आयुष्यमान वाढणं
२ ताणतणावाचं निराकरण
३ अस्वस्थतेचे आजार व नैराश्याचा आजार टाळणं किंवा झाल्यास लवकर बरं होण्यात मदत होणं
४ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढणं
५ व्यक्तिमत्त्व विकास
६ शारीरिक व मानसिक आजार लवकर बरे होणं.
७ भौतिक आयुष्यात हवं असणारं यश, समृद्धी स्वकर्तृत्वानं मिळवता येणं.
८ सकारात्मक विचारसरणी रुजविण्यासाठी व्हिज्युलायझेशन तंत्रे व स्वयंसूचना यांचा उपयोग होतो.