

MHT CET 2026 Admission Rules: Class 12 Marks to Get Equal Weightage for Engineering and Pharmacy
sakal
MHT CET 2026 New Admission Policy: राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश केवळ 'एमएचटी-सीईटी' च्या गुणांवर न होता, बारावी बोर्डाच्या गुणांनाही त्यात समान प्राधान्य दिले जाणार आहे. या दोन्ही परीक्षांच्या गुणांचा समतोल साधणारे नवे धोरण निश्चित करण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे.