MHT CET Result 2022 : महाराष्ट्र सीईटी PCM आणि PCBचा निकाल आज होणार जाहीर, 'असा' बघा निकाल

आज निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला सुरूवात होईल
MHT CET Result 2022
MHT CET Result 2022esakal

MHT CET Result 2022 : महाराष्ट्र सीईटी परीक्षा PCM आणि PCBचा निकाल आज १५ सप्टेंबरला जाहिर होणार आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रांस टेस्ट सेलकडून एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात येईल. हा निकाल परीक्षार्थींना cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर बघता येईल. हा निकाल सायंकाळी पाच वाजता घोषित करण्यात येणार आहे.

एमएचटी सीईटी पीसीएम परीक्षा ५ ते ११ ऑगस्ट या कालावधीत पूर्ण झाली तर एमएचटी सीईटी पीसीबी परीक्षा १२ ते २० ऑगस्टदरम्यान पार पडली. या परीक्षेचा निकाल तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर बघता येईल.

या वेबसाईटवर बघा निकाल

cetcell.mahacet.org

mahacet.org

MHT CET PCB आणि PCM चा निकाल बघण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

आधी mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

यानंतर तुमच्यापुढे होमपेज येईल

होमपेजवरील स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा

आता लॉग इन करा

तुमचा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल

या निकालावर विद्यार्थ्यांच्या पुढील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश निश्चिती अवलंबून असते. निकाल लागताच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com