

Creative Revolution: How Midjourney AI is Redefining Graphic Design and Marketing
Sakal
सीए प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर
पूर्वी एखादे आकर्षक चित्र, पोस्टर किंवा डिझाइन तयार करायचे असल्यास ग्राफिक डिझायनर, सॉफ्टवेअर आणि बराच वेळ लागायचा. आज मात्र फक्त काही शब्द लिहून अप्रतिम चित्र तयार होत आहे. हे शक्य करून दाखवले आहे, ‘मिडजर्नी’ या एआय टूलने. आज सोशल मीडिया, जाहिरात, यूट्यूब, मार्केटिंग आणि डिझाइन क्षेत्रात ‘मिडजर्नी’ प्रचंड लोकप्रिय होत आहे. कारण हे टूल कल्पनांना चित्ररूप देण्याचे काम करते.