esakal | 'मुक्‍त'तर्फे विद्यार्थ्यांना घरपोहोच मिळणार मायग्रेशन सर्टिफिकेट, जाणून घ्या प्रोसेस
sakal

बोलून बातमी शोधा

migration certificates will be sent home to students of ycmou see process

'मुक्‍त'तर्फे विद्यार्थ्यांना घरपोहोच मिळणार मायग्रेशन सर्टिफिकेट

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे (YCMOU) विद्यार्थ्यांना घरपोहोच मायग्रेशन प्रमाणपत्र (migration certificate) मिळणार आहे. सध्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्‍ध असेल. ऑनलाइन अर्ज व शुल्‍क अदा केल्‍यानंतर, पुढील प्रक्रिया स्‍पीड पोस्‍टाने राबविली जाईल. विद्यापीठास अर्ज प्राप्त होताच आठ ते दहा दिवसांत प्रमाणपत्र घरपोहोच दिले जाणार आहे.

मुक्‍त विद्यापीठाने सुचनापत्र जारी केले आहे. त्‍यानुसार मायग्रेशन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुक्‍त विद्यापीठात येण्याची आवश्‍यकता नाही. तसेच धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) काढण्याचीही गरज नाही. विद्यार्थी घरबसल्‍या ऑनलाइन अर्ज आणि शुल्‍क भरुन आणि अर्जाची प्रिंट व मार्कशिट, पासिंग पोस्‍टने पाठवून त्‍वरीत आपले मायग्रेशन प्राप्त करुन घेऊ शकतील. विद्यापीठाच्‍या सर्व शिक्षणक्रमांच्‍या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सुविधेसाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्‍ध केली आहे. ही सुविधा २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असेल.

हेही वाचा: बँकेच्या भरती परीक्षा आता मराठीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार

अशी आहे प्रक्रिया-

विद्यार्थ्यांनी ycmou.digitaluniversity.ac या विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळला भेट देत अर्ज करायचा आहे. स्‍टुडंट लॉगीन क्‍लिकद्वारे सोळा अंकी कायम नोंदणी क्रमांक (पीआरएन) आणि पासवर्ड दाखल करत प्रक्रिया राबवायची आहे. याअंतर्गत ई-सुविधा पर्यायाद्वारे मायग्रेशनच्या पर्यायावर क्‍लिक करायचे आहे. यावेळी गुणपत्रिकेचा, शैक्षणिक वर्षासह अन्‍य तपशील दाखल करावा लागेल. यानंतर ऑनलाइन पद्धतीने शुल्‍क अदा करायचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्‍यानंतर दाखल अर्ज व शुल्‍क भरल्‍याची प्रत, शेवटच्‍या गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडून विद्यापीठाला स्‍पीड पोस्‍टने पाठवायचे आहे. 'उपकुलसचिव, परीक्षा विभाग- मायग्रेशन सेल, यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक-४२२ २२२' या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. विद्यापीठास अर्ज प्राप्त झाल्‍यानंतर आठ ते दहा दिवसांनी मायग्रेशन प्रमाणपत्र स्‍पीड पोस्‍टाने पाठविले जाणार आहे.

हेही वाचा: पदविका (डिप्लोमा) नंतर अभियांत्रिकी

loading image
go to top