esakal | बँकेच्या भरती परीक्षा आता मराठीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार I Bank Exam
sakal

बोलून बातमी शोधा

Bank Recruitment
बँकेच्या भरती परीक्षा आता मराठीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार

बँकेच्या भरती परीक्षा आता मराठीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सार्वजनिक क्षेत्रातील सर्व 12 बँकांमध्ये लिपिक पदासाठी भरतीच्या परीक्षा आता मराठीसह 13 प्रादेशिक भाषांमधून देता येणार आहेत. त्यामुळे आता बँकिंग भरती परीक्षांच्या जाहिरातीही प्रादेशिक भाषांतून देण्याच्या सूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिल्या आहेत. 12 सरकारी बँकांमधील भरती संदर्भात प्रारंभिक आणि मुख्य दोन्ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित केल्या जाव्यात, अशी शिफारस केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केलीय.

सरकारी क्षेत्रातील बँकांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये लिपिक श्रेणीसाठी परीक्षा आयोजित करण्याप्रकरणी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून एका समितीनं ही शिफारस केलीय. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून सुरू करण्यात आलेल्या परीक्षा आयोजित करण्याची विद्यमान प्रक्रिया समितीच्या शिफारसी उपलब्ध होईपर्यंत रोखून ठेवण्यात आल्या होत्या. समितीनं हा निर्णय स्थानिक तरुणाईला रोजगाराची एक समान संधी प्रदान करणं आणि स्थानिक/प्रादेशिक भाषेच्या माध्यमातून ग्राहकांसोबत अधिकाधिक जुळण्याच्या उद्देशानं घेतला आहे. यामुळे ग्राहक आणि बँक यांच्यात कम्युनिकेशन गॅपची शक्यता कमी होणार आहे.

हेही वाचा: Success Story : निरक्षर दांपत्याचा मुलगा बनला 'CA'

'या' आहेत 12 बँका

 1. भारतीय स्टेट बँक

 2. पंजाब नॅशनल बँक

 3. बँक ऑफ बड़ौदा

 4. बँक ऑफ इंडिया

 5. बँक ऑफ महाराष्ट्र

 6. कॅनरा बँक

 7. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया

 8. इंडियन बॅंक

 9. इंडियन ओवरसीज बॅंक

 10. पंजाब एंड सिंध बॅंक

 11. पंजाब नॅशनल बैंक

 12. यूको बॅंक

हेही वाचा: UPSC मुलाखतीला मिळालेत सर्वाधिक गुण; वाचा पहिला प्रश्न आणि उत्तर

प्रादेशिक भाषेत होणार परीक्षा : या बँकांच्या भरती परीक्षा मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगु अशा 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार आहेत.

एसबीआय आगामी परीक्षांसाठी हा निर्णय राबवणार : आधीच जाहिरात केलेल्या रिक्त पदांसाठी आणि ज्यासाठी प्राथमिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या, त्या एसबीआयची सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया जाहिरातीनुसार पूर्ण केली जाईल. प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भविष्यातील रिक्त पदांवर देखील लागू होईल. तसेच, उमेदवार इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देऊ शकतील. यामुळे ग्राहक आणि बँक यांच्यातील संवादातील अंतर कमी होण्याची शक्यता कमी होणार आहे.

loading image
go to top