कॉमर्स व व्यवस्थापन शिक्षणातील संधी...

जागतिकीकरणामुळे खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी निर्माण झाली आहे
Milind Alandikar writes Opportunities in Commerce and Management Education
Milind Alandikar writes Opportunities in Commerce and Management Educationsakal
Summary

जागतिकीकरणामुळे खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी निर्माण झाली आहे. सरकारच्या उदारीकरणाच्या धोरणांमुळे सार्वजनिक क्षेत्राबरोबर खासगी क्षेत्रातील उद्योग-व्यवसायाला चालना मिळाली.

जागतिकीकरणामुळे खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी निर्माण झाली आहे. सरकारच्या उदारीकरणाच्या धोरणांमुळे सार्वजनिक क्षेत्राबरोबर खासगी क्षेत्रातील उद्योग-व्यवसायाला चालना मिळाली. बदलत्या औद्योगिक धोरणांमुळे उत्पादन व सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होऊ लागल्या.

सर्वसाधारणपणे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा कल बी. कॉम. पदवीशिवाय आजपर्यंत सी.ए., सी.एस. व आय. सी. डब्ल्यू.ए. या क्षेत्राकडे असे. परंतु बदलत्या परिस्थिती आधुनिक व्यवस्थापन व संगणकीय माहिती तंत्रज्ञान (आय.टी.), बॅकिंग, पर्यटन, विमा, हॉस्पिटॅलिटी, पत्रकारिता, विविध कर (टॅक्सेस), जाहिरात, संशोधन अशा क्षेत्रात स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक व्यावसायिक शिक्षणाच्या संधी वाणिज्य शाखेतंर्गत उपलब्ध होत आहेत.

जागतिक स्पर्धेच्या युगात आंतरराष्ट्रीय व स्थानांतंर्गत पातळीवर कार्यरत असणाऱ्या उत्पादन तसेच सेवाक्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रामुळे विविध स्तरावरील मनुष्यबळाची गरज निर्माण होत आहे. त्या दृष्टिकोनातून गुणकौशल्यावर आधारित कॉमर्स शाखेतंर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना चालना मिळत आहे.

बी.बी.ए., बी.बी.ए. (कॉम्प्युटर अॅप्लिकेशन), बी.बी.ए. (आय. बी.) हे पदविका अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य विद्याशाखेतंर्गत व्यावसायिक गुणकौशल्याचा विकास होऊन मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक जगतात आवश्यक असणारे स्थान मिळाले आहे. परिणामी व्यावसायिकदृष्ट्या सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेले आहे. यानंतर एम.बी.ए. पदविका व तत्सम पदविका संपादन करणे अधिक सुलभ ठरू शकते. या अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण असणाऱ्या कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थी पात्र होऊ शकतो.

१) बी.बी.ए. (बॅचलर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन)

बीबीए हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आहे. व्यावसायिक व्यवस्थापनाला आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचा या अभ्यासक्रमात अंतर्भाव केलेला आहे. प्रात्यक्षिक ज्ञानाच्या दृष्टीने कार्यशाळा, उद्योगक्षेत्रातील नामांकित कंपन्यांना भेटी, चर्चासत्रे, परिसंवाद, सादरीकरण (प्रेझेंटेशन), अशा विविध पद्धतीने अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण दिले जाते.

२) बी.बी.ए. (सी.ए.) (बॅचलर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन/कॉम्प्युटर अॅप्लिकेशन)

बी.बी.ए. (सी.ए.) हा अभ्यासक्रम पूर्वी बी. सी. ए. नावाने ओळखला जात होता. खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी या अभ्यासक्रमाची विशेष ओळख आहे. पदवी पातळीवरच या अभ्यासक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक संधी निर्माण होत असतात. हा तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम असून व्यवस्थापन व कॉम्प्युटर क्षेत्रातील अनेक विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com