mind
sakal
- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
मित्रवर्य राजू, केव्हापासून माझ्या अवतीभोवती चकरा मारत होता. शेवटी न राहवून त्याने विचारलेच, ‘तू जे प्रियाराधनेचे म्हणत होतास? त्याला माइंडफूलनेस अवस्थेचा कसा उपयोग होतो? निदान माइंडफुलनेसची व्याख्या तरी सांग. माझं मी उपयोगाचे शोधून घेईन.’
मी खदाखदा हसलो. त्याच्यातील बालसुलभ म्हणजे तसे तारुण्यसुलभ कुतूहलाचे मला हासू आले. ‘अरे, घाई करू नकोस. सारं कसं हळुवार पद्धतीने करावं.’ मी उद्गारलो.