सिव्हिल आणि पॉलिमर इंजिनिअरिंगवर विनामूल्य वेबिनारचे आयोजन

जाहिरात
Thursday, 22 October 2020

एमआयटी-डब्ल्यूपीयू आणि सकाळ माध्यम समूहाने सिव्हिल अभियांत्रिकी आणि पॉलिमर अभियांत्रिकी बीटेक (B.Tech) वर वेबिनार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा वेबिनार २६ ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी  ४  वाजता घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थी https://us02web.zoom.us/webinar/register/8016033430778/WN_oVkEEDhWTvSsB1ZQGsA5Rg  येथे नोंदणी करू शकतात.

पुणे: उद्योग जगातील बदलत्या गरजेमुळे करिअरचे अनेक पर्याय खुले झाले आहेत जे काही दशकांपूर्वी ऐकले ही नव्हते. ह्या बदलत्या काळात, विद्यार्थ्यांसमोर अनेक उत्तम पर्याय निर्माण झाले आहेत. अभियांत्रिकी मध्ये देखील असे बरेच नवीन अभ्यासक्रम सुरु झाले आहेत ज्यात नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. उद्योगक्षेत्रातील हे बदल लक्षात घेऊन, एमआयटी-डब्ल्यूपीयू आणि सकाळ माध्यम समूहाने सिव्हिल अभियांत्रिकी आणि पॉलिमर अभियांत्रिकी बीटेक (B.Tech) वर वेबिनार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा वेबिनार २६ ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी  ४  वाजता घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थी https://us02web.zoom.us/webinar/register/8016033430778/WN_oVkEEDhWTvSsB1ZQGsA5Rg  येथे नोंदणी करू शकतात.

एमआयटी-डब्ल्यूपीयूला 4 दशकांचा वारसा आहे आणि हे परिवर्तनासाठी अग्रगण्य विद्यापीठ आहे. ह्या विद्यापिठात, शिक्षण आणि भविष्यातयेणाऱ्या संधी लक्षात घेऊन अभ्यासक्रम ठरवला जातो. बरेच अभ्यासक्रम हे जागतिक विद्यापीठांच्या सहकार्याने विकसित केले गेले आहेत. सध्या तंत्रज्ञानाचे क्षेत्र वेगाने वाढत आहे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने ह्याक्षेत्राकडेआकर्षित होत आहेत. आताच्या काळात बरेच विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रात पुढे जाण्यास इच्छुक आहेत. हा वेबिनार अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे .

योग्य अभ्यासक्रम निवडणे हा विद्यार्थ्यांसमोर एक महत्त्वपूर्ण निर्णय असतो कारण हा निर्णय त्यांच्या कारकीर्दीची दिशा ठरवतो आणि पुढे त्यांचे भविष्य घडवतो.
एमआयटी-डब्ल्यूपीयूचा बीटेक अभ्यासक्रम हा देशातील सर्वोत्तम अभ्यासक्रमात गणला जात असून तो खाजगी अभियांत्रिकी संस्था, पश्चिम विभाग २०२० च्या क्रमवारीत (Top Private Engineering Institute Rankings 2020 ,West zone by Times Top
Institutes of West India Survey 2020),दुसऱ्या स्थानकावर आहे.

सद्याच्या काळात, सिव्हिल अभियांत्रिकी आणि पॉलिमर अभियांत्रिकीमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत आणि बरेच विद्यार्थी ह्या क्षेत्राकडे वळत आहेत.

सिव्हिल अभियांत्रिकी: 
आताच्या 21 व्या शतकात विध्यार्थी  डिजिटल क्षेत्राकडे वळत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या मागणीमुळे  सिव्हिल अभियांत्रिकीचे महत्त्व वाढले आहे. विविध  पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांच्या उभारणीसाठी, सिव्हिल अभियांत्रिकीची गरज वाढत आहे. डॅमच्या कामापासून ते इमारती, रस्ते व बंदरे बनवण्यापर्यंत आणि माणसाने बनवलेल्या प्रत्येक संरचनेसाठी सिव्हील अभियंता आवश्यक आहेत. एमआयटी-डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ सिव्हील इंजिनीअरिंग मध्ये विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण  दिले जाते. बीटेक-सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये विविध प्रशासन, वित्त आणि बांधकाम यांच्या व्यवस्थापनासह नियोजन, डिझाइन, बांधकाम आणि देखभाल या सूक्ष्म  गोष्टींचे शिक्षण दिले जाते. इथे माजी विद्यार्थ्यांचे एक सक्रिय नेटवर्क आहे जिथे ते एकमेकांना प्रभावीपणे सहकार्य करतात आणि संवाद साधतात. आताच्या बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (artificial intelligence), मशीन लर्निंग (machine learning), डेटा सायन्स (data science, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) सारख्या विशेष अभ्यासक्रमाचा देखील समावेश विद्यार्थ्यांसाठी केला आहे.

उद्योग संधी:
सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करू शकतात. पाटबंधारे, धरणे, कालवे, जल विद्युत, रस्ते, रेल्वे, इमारती, औद्योगिक संरचना, पूल, गोदी, हार्बर, एअरफील्ड्स, बोगदे, पर्यावरण अभियांत्रिकी इ. क्षेत्रात सिव्हिल अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे.

पॉलिमर अभियांत्रिकी: 
पोलीमर्स ची आवश्यकता सर्वच क्षेत्रात वाढत आहे. पॉलिमर अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यापक संशोधनIमुळे ह्या क्षेत्रात बऱ्याच उद्योग संधी निर्माण झाल्या आहेत. पॉलिमर आता वीज वाहून नेणे, सुपरहीटेड पदार्थ आणि नॅनो टेक्नॉलॉजी सारख्या असंख्य ग्राउंड ब्रेकिंग तंत्रज्ञानामध्ये सामील होत आहे. पॉलिमरची बाजारपेठ 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि ही संख्या वाढत आहे. नवीन संशोधनामुळे, पॉलिमर अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, वैद्यकीय उपकरणे ह्या सर्व क्षेत्रात
उपयुक्त ठरत आहे.

पॉलिमर अभियांत्रिकीची एमआयटी-डब्ल्यूपीयू स्कूल ही देशातील पहिली खासगी पॉलिमर अभियांत्रिकी अभ्यासक्रम  देणारी संस्था आहे. पॉलिमर सायन्स चे मूलभूत ज्ञान तसेच अनेक उद्योग भेटींद्वारे पॉलिमर उद्योगातील अद्ययावत प्रगती व तंत्रज्ञानाची विस्तृत माहिती घेऊन या कोर्सची रचना केली गेली आहे. आताच्या बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (artificial intelligence), मशीन लर्निंग (machine learning), डेटा सायन्स (data science), इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT ) सारख्या विशेष अभ्यासक्रमाचा देखील समावेश विद्यार्थ्यांसाठी केला आहे.

उद्योग संधी:
पॉलिमर अभियांत्रिकी मध्ये उत्तीर्ण झाल्यावर, विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, वैद्यकीय उपकरणे, ऑटोमोबाईल, इ. अशा सर्वच क्षेत्रात पॉलिमर चा वापर आणि पॉलिमर अभियंत्यांची गरज वाढत आहे.

ह्या दोन्ही अभ्यासक्रमांची आजची वाढती गरज लक्षात घेऊन, एमआयटी-डब्ल्यूपीयू आणि सकाळ माध्यम
समूह ह्यांनी एक वेबिनार आयोजित केला आहे. हा वेबिनार २६ ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी  ४  वाजता घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थी https://us02web.zoom.us/webinar/register/8016033430778/WN_oVkEEDhWTvSsB1ZQGsA5Rg  येथे नोंदणी करू शकतात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIT webinar on Civil engineering and Polymer engineering