MIT-WPU : पेट्रोलियम अभियांत्रिकी 2021 अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MIT-WPU : पेट्रोलियम अभियांत्रिकी 2021 अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

MIT-WPU : पेट्रोलियम अभियांत्रिकी 2021 अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-डब्ल्यूपीयू) ची स्थापना तीन मूलभूत तत्त्वांवर झाली आहे: प्रथम, शिक्षणासाठी सामाजिक संदर्भ प्रदान करणे; दुसरे, विद्यार्थ्यांना करिअरचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य देणे; आणि सक्रिय शिक्षणाला प्रोत्साहन देणे. सदर विद्यापीठात अभियांत्रिकी विद्याशाखेत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. येथे इतर विद्यशाखांबरोबर पेट्रोलियम अभियांत्रिकीमध्ये पदवी (B. Tech.) आणि पदव्युत्तर (M. Tech .) (नियमित आणि संशोधन) या वेगळ्या विद्याशाखा मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विद्यापीठ मूल्याधारित शिक्षण, संशोधन आणि या क्षेत्रातील उद्योगांच्या सहयोगाद्वारे संबंधित विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षण अनुभव प्रदान करते.

या अभ्यासक्रमाद्वारे उत्पादन (Production) , विंधन (Drilling) तसेच रिजर्व्हायर (Reservoir) अभियांत्रिकी, तेल शुद्धीकरण व वाहतूक, माहिती विश्लेषणे (data analytics), पुरवठा साखळी व्यवस्थापन (supply chain management) पेट्रोलियम अर्थशास्त्र या विषयातील संधी अभियंत्यांना उपलब्ध होतात.

अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये: या क्षेत्रातील अभियंते प्रशिक्षित करण्याचा विद्यापीठाच्या चाळीस वर्षांचा अनुभव हि सर्वात जमेची बाजू आहे. तेल आणि वायू उद्योगाला सक्षम आणि पात्र मनुष्यबळाची सतत मागणी असते. हि गरज 1983 मध्ये माननीय प्रा.विश्वनाथ कराड यांनी एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये पेट्रोलियम अभियांत्रिकीमध्ये पदवी सुरू करून ओळखली. सदर क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात वेग वेगळे कालानुरूप बदल केले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि गैर-शैक्षणिक कामगिरीवर आधारित वेग वेगळ्या शिष्यवृत्त्या प्रदान केल्या आहेत.

पेट्रोलियम अभियांत्रिकीमधील पदवीचा अभ्यासक्रम हा चार वर्षांचा पूर्णवेळ असून, तो बारा तिमाहीत (Trimester) विभागलेला आहे; पेट्रोलियम अभियांत्रिकी मधील एम.टेक हा दोन वर्षांचा पूर्णवेळ कार्यक्रम आहे. जगभरातील तेल कंपन्यांमध्ये १४०० होऊन अधिक काम करणारे माजी विद्यार्थी हि या अभ्यासक्रमाची आगळी वेगळी ओळख आहे. तसेच विभागात दहा प्रगत प्रयोगशाळा, तसेच निर्माण होऊ घातलेली Sub sea प्रयोगशाळा तसेच 3 आंतरराष्ट्रीय संस्थांचे student chapter हे वैशिष्ट्य आहे

प्लेसमेंट आणि रिक्रूटर्स: तेल आणि वायू क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या ऑन आणि ऑफ कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हसाठी वेळोवेळी येत असतात तसेच इंटर्नशिपच्या स्वरूपात इच्छुक विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव पण देतात. एमआयटी-डब्ल्यूपीयू विद्यार्थ्यांना १००% प्लेसमेंट सहाय्य देते. उदा. मागील वर्षी, विद्यार्थ्यांना मिळालेले वेतन पॅकेज हे प्रतिवर्ष १३ लाख रुपये होते. आमच्या येथे एक्सॉन मोबिल, केर्न वेदांत, एन्व्हरस, जॉन एनर्जी इंटरनॅशनल, टिएटो एव्हरी या सारख्या नावाजलेल्या कंपन्या प्लेसमेंट साठी येत असतात.

पात्रता निकष: एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये बी.टेक कार्यक्रमासाठी पात्र होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी 2021 (महाराष्ट्र अधिवास उमेदवारांसाठी) आणि/किंवा जेईई (मेन्स) 2021 (अखिल भारतीय उमेदवारांसाठी) या परीक्षा मध्ये पात्रता आणि वैध गुण मिळवणे आवश्यक आहे. या शिवाय, पात्र होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी कोणत्याही वैधानिक मंडळाकडून विज्ञानात गणित, भौतिक व रसायन शास्त्रासह किमान 50% गुणांसह 10+2 उत्तीर्ण असावे.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया: एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या बीटेक पेट्रोलियम आणि इतर अभ्यासक्रमासाठी सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन अर्ज स्वीकारत आहेत. सदर अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी आहे. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार आणि कोठूनही ऑनलाईन अर्ज भरू शकतात. विद्यार्थी येथे दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज भरू शकतात : https://mitwpu.edu.in/admissions

प्रवेश फेरीच्या तारखा आणि माहिती :

  • प्रवेश फेरीची पुढील तारीख : सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात

  • MIT-WPU च्या B.Tech कार्यक्रमात प्रवेशासाठी इच्छुक MHT-CET किंवा JEE (Mains) किंवा WPU MEET (MIT Engineering Entrance Test) द्वारे अर्ज करू शकतात.

  • बीटेक कार्यक्रम आणि प्रवेश फेरी, तारखा आणि एकूण प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक अपडेट मिळवण्यासाठी येथे दिलेल्या लिंकला भेट द्या : https://admissions.mitwpu.edu.in/btech/

loading image
go to top