Pune News : शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर विशेष बैठक घेण्याची आमदार सत्यजित तांबे यांची मागणी

शिक्षण विभागात शिक्षकांच्या भरतीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा
MLA Satyajit Tambe demand for special meeting on pending issues in education sector deepak kesarkar pune
MLA Satyajit Tambe demand for special meeting on pending issues in education sector deepak kesarkar puneesakal

पुणे : ‘‘शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तातडीने विशेष बैठक आयोजित करावी,’’ अशी मागणी करणारे निवेदन आमदार सत्यजित तांबे यांनी केसरकर यांना दिले आहे.

शिक्षण विभागात शिक्षकांच्या भरतीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये सध्या शिक्षक नसल्याने अवस्था बिकट आहे. त्याशिवाय अनुदानित शाळांना वेळेत अनुदान न मिळणे, वेतनेतर अनुदान न मिळणे यामुळे अनेक उपक्रमांना खीळ बसली आहे. या सर्व गोष्टींमुळे सरकारी शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. त्यातच आता कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून समूह शाळा सुरू करण्याचा निर्णयही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी घातक असल्याचे तांबे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

MLA Satyajit Tambe demand for special meeting on pending issues in education sector deepak kesarkar pune
Satyajeet Tambe News : शैक्षणिक धोरणाची जलद, प्रभावी अंमलबजावणी आवश्‍यक : आमदार सत्‍यजित तांबे

तांबे म्हणाले, ‘‘पावसाळी अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षणाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत बैठक घेण्याची घोषणा केली होती. मात्र आता ऑक्टोबर उजाडला तरी ही बैठक झालेली नाही. लवकरात लवकर ही बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत’’ याशिवाय, साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या शाळेला ऐतिहासिक वारसा आहे. या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक कर्तृत्ववान व्यक्तींचे शिक्षण झाले आहे. या शाळेत एप्रिलपासून शिक्षकच उपलब्ध नसल्याची बाब लाजिरवाणी असल्याचे तांबे यांनी निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com