esakal | मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची संधी, पगार 1.60 लाख रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

jobs

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची संधी, पगार 1.60 लाख रुपये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

MMRCL Mumbai Metro Recruitment 2021 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुंबई मेट्रोमध्ये आस्थापनेवर विविध पदांवर भरती सुरु झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 17 जुलैपासून अर्ज मागवण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. 22 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकता. या भरती अंतर्गत 19 जागा भरण्यात येणार आहेत. उप अभियंता आणि ज्युनिअर अभियंता या पदाच्या विविध जागा भरण्यात येणार आहेत. मुंबई मेट्रो रेलच्या अधिकृत संकेतस्थळावर करिअर सेक्शनमध्ये recruitment वर क्लिक करुन. जाहीर डाउनलोड करा. यामध्ये सविस्तर माहिती मिळेल.

अर्जदारानं एआयसीटीई (एआयसीटीई) किंवा यूजीसीची (यूजीसी) मान्यता असलेल्या कोणत्याही विद्यापीठातून संबंधित शाखेमध्ये बीई किंवा बीटेक पूर्ण केलेलं असावं. 35 हजार ते एक लाख 60 हजारपर्यंत पदानुसार पगार दिला जाणार आहे. ही भरती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. यासंदर्भातील अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. https://www.mmrcl.com/sites/default/files/Advt.%202021%20-%2004-%20Website%20copy%20%281%29.pdf

हेही वाचा: कोरोनाचा विळखा सैल होतोय, नवीन रुग्णसंख्या 30 हजारांवर

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL - लाईन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051

loading image