'एमएनएस'ची परीक्षा होणार सप्टेंबरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 July 2020

परीक्षेची तारीख अद्याप ठरली नसून लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे
 

पुणे : देशातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत लष्कराच्या वैद्यकीय विभागासाठी घेतली जाणारी 'मिलिटरी नर्सिंग सर्विसेस'ची (एमएनएस) 'बीएससी नर्सिंग कोर्स' परीक्षा यंदा पुढे ढकलण्यात अली आहे. तर ही परीक्षा यंदा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असून अद्याप याची तारीख निश्चित झालेली नाही. याबाबतची माहिती लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मुली व महिलांना लष्करात कार्य करण्यासाठी एमएनएस हा सुद्धा एक पर्याय आहे. दरवर्षी ही परीक्षा लेखी स्वरूपात घेण्यात येते. तर यावर्षी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीत घेतली जाणार आहे. यंदा एमएनएसची परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात येणार होती. मात्र कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात अली असून परीक्षेची तारीख लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. 

बारावी नंतर, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणानंतर सुद्धा मुलींना या परीक्षेसाठी अर्ज भरता येतो. तसेच यासाठी वयाची मर्यादा 17 ते 25 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यासाठी देशातील सहा शहरांमध्ये असलेल्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये पुणे शहरातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचा (एएफएमसी) सुद्धा समावेश आहे.  परीक्षेबाबत अधिक माहिती साठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The MNS exam postpened and will be held in September