

Mukhyamantri Shikha Aur Kamayo Yojana
esakal
मध्य प्रदेश सरकारची 'मुख्यमंत्री शिका आणि कमवा योजना' १८ ते २९ वर्षे वयोगटातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षणासोबत आर्थिक मदत देणारी योजना आहे. या योजनेत शैक्षणिक पात्रतेनुसार तरुणांना दरमहा ८,००० ते १०,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड दिला जातो. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळत असल्याने कौशल्यासोबत रोजगाराच्या संधीही वाढण्याची शक्यता आहे.
योजनेअंतर्गत १२वी उत्तीर्ण उमेदवारांना ८,००० रुपये, ITI उत्तीर्णांना ८,५०० रुपये, डिप्लोमाधारकांना ९,००० रुपये, तर पदवीधर आणि त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना १०,००० रुपये मासिक स्टायपेंड मिळतो.