
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सुरू केलेली ‘ई-केवायसी’ प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुन्हा एकदा लांबणीवर टाकली आहे. आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, ई-केवायसी सुरू करण्याची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.