MPSC KYC Update Alert: आता 'आधार' नसला तर परीक्षा द्यायची संधीही नाही; १५ जुलैपासून KYC सक्तीचं

Is Aadhaar compulsory for MPSC 2025: १५ जुलैपासून एमपीएससी परीक्षेसाठी आधार-आधारित केवायसी सक्तीचं; नियम न पाळल्यास अर्ज होणार बाद.
Adhar KYC Mandatory for MPSC Exam Registration
Adhar KYC Mandatory for MPSC Exam Registrationsakal
Updated on

MPSC New Exam Rules 2025: एमपीएससी परीक्षा देणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आला आहे. १५ जुलै २०२५ पासून परीक्षा अर्ज करण्याआधी आधार-आधारित केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. बनावट उमेदवार आणि परीक्षेतील फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

आता एमपीएससीच्या पोर्टलवर अर्ज भरताना आधी तुमचं केवायसी व्हेरिफिकेशन होणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचा अर्ज सरळ नाकारला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी शेवटची तारीख न थांबता, लवकरात लवकर ही प्रक्रिया पार पाडावी, असं आयोगाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

याआधी २०१७ पासून आधार क्रमांकाचा पर्यायी वापर ओळख पटवण्यासाठी करता येत होता. मात्र आता युआयडीएआयनं (UIDAI) भरती प्रक्रियेसाठी आधार-आधारित ओळख पडताळणीला अधिकृत मान्यता दिल्यामुळे एमपीएससीनं ही प्रक्रिया अधिक कठोर केली आहे.

Adhar KYC Mandatory for MPSC Exam Registration
UPSC Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC कडून 241 पदांची भरती सुरू; जाणून घ्या अर्ज कुठे आणि कसा करायचा

नवीन नियमानुसार, अर्ज करताना दिलेला मोबाईल नंबर तुमच्या आधारकार्डशी लिंक असणं अत्यावश्यक आहे. एकदा ओळख पडताळणी पूर्ण झाली, की उमेदवाराला एमपीएससीच्या वेबसाईटवर एकच ॲक्टिव्ह (Active) खाते वापरता येईल. जर डुप्लिकेट किंवा एकापेक्षा जास्त खाती असतील, तर ती आपोआप डिॲक्टिवेट (Deactivate) केली जातील.

परीक्षेचा अर्ज करतानाच नाही, तर परीक्षा केंद्रावरही आधार-आधारित ओळख पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार असून विश्वासार्हता देखील वाढणार आहे.

एमपीएससीच्या या नव्या निर्णयामुळे परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत फसवणुकीला आळा बसेल आणि पात्र उमेदवारांनाच संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांनी लवकरात लवकर आपली ओळख पडताळणी करून पुढील प्रक्रियेसाठी सज्ज व्हावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com