
MPSC: उत्तरपत्रिकेतील चुकांमुळे मुल्यांकनात येतात अडचणी, आयोगाकडून तपशील जाहीर
MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षावेळी उमेदवारांच्या होणाऱ्या चुकासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. उमेदवारांच्या अशा चुकामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले आहे. या चुकांसंदर्भात मुल्यांकन कसं केलं जाणार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
(MPSC Exam Update)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परिक्षांकरीता उत्तरपत्रिकेवर तपशील नमूद करण्याच्या वेळी उमेदवार व काहीवेळेस संबंधित समवेश्रक यांच्याकडून चुका होत असल्याचे निदर्शनास येते. या चुकांमुळे उमेदवारांचे नुकसान होते. हे नुकसान होऊ नये यासाठी आयोगाच्या कार्यालयाकडून उचित कार्यवाही करण्यात येणार असून त्यासंदर्भात आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. अशा चुका झाल्यावर उमेदवारांकडून आयोगाला मेल किंवा दूरध्वनीद्वारे याचा पाठपुरावा केला जातो. त्यामुळे आता आयोगाने यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Web Title: Mpsc Exam Answer Sheet Wrong Information Commission Take Action
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..