MPSC : कॉपीप्रकरणी ‘ॲक्शन’ मोडमध्ये; दोषींवर कारवाई इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांमध्ये सामुहिक कॉपी केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

MPSC : कॉपीप्रकरणी ‘ॲक्शन’ मोडमध्ये; दोषींवर कारवाई इशारा

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांमध्ये सामुहिक कॉपी केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच यापूर्वी झालेल्या कॉपी प्रकरणांची कसून चौकशी करण्यात येत असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एमपीएससीने सांगितले.

एमपीएससीद्वारे परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. संयुक्त गट क मुख्य परीक्षेचा पेपर एक परीक्षा शनिवारी (ता. ८) पार पडली. या वेळी एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी शेवटच्या २० मिनिटांमध्ये सामुहिक कॉपी केली. तसेच कॉपीचा प्रकार संबंधित पर्यवेक्षकाने थांबवला नाही, अशी तक्रार एका विद्यार्थ्याने एमपीएससीकडे केली आहे. त्यानुसार एमपीएससीने या तक्रारीची दखल घेत संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला होता. आता त्या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

सीसीटीव्ही कॉमेऱ्याद्वारे परीक्षार्थींवर लक्ष ठेवले जात आहे. शनिवारी झालेल्या परीक्षेत ज्यांनी असा प्रकार केला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तपासणीत जे दोषी आढळतील आणि गंभीर प्रकार केला असेल तर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच ज्या पर्यवेक्षकांची चूक आढळून येईल, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

- किशोर राजेनिंबाळकर, अध्यक्ष, एमपीएससी

Web Title: Mpsc Exam Mass Copying Crime Warning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeWarningMPSC Exam