
छत्रपती संभाजीनगर : लोकसेवा आयोगातर्फे राज्य शासनाच्या विविध विभागातील गट ‘क’ संवर्गातील १ हजार ६१८ पदांसाठी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा निकाल ६ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. आता मुख्य परीक्षेसाठी पात्र प्रवेशासाठी अर्ज प्रक्रीया सुरू झाले असून ता.२१ सप्टेंबर रोजी राज्यातील सहा केंद्रावर गट क मुख्य परीक्षा होणार आहे.