MPSC Exam : एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (ता.३०) पार पडत आहे.
MPSC Exam
MPSC Examesakal
Summary

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (ता.३०) पार पडत आहे.

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (ता.३०) पार पडत आहे. एकूण आठ संवर्गातील ८ हजार १६९ पदांच्या भरतीसाठी एमपीएससीकडून ही पूर्व परीक्षा घेण्यात येत असून, एमपीएससीच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पदांसाठीची ही पहिलीच भरती प्रक्रिया आहे.

अराजपत्रित गट-ब आणि गट-क संवर्गातील पदांसाठीच्या या परीक्षेसाठी राज्यभरातील जवळपास चार लाख ६६ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरला आहे. राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल. तर गट ब सेवा मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा २ सप्टेंबरला आणि गट क सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपीक-टंकलेखक अशा एकूण ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

‘या’ विभागांमध्ये होणार भरती -

सामान्य प्रशासन विभाग - सहायक कक्ष अधिकारी - ७० पदे

महाराष्ट्र लोकसेवा आयोग - सहायक कक्ष अधिकारी - ८ पदे

वित्त विभाग -

१) राज्य कर निरीक्षक - १५९ पदे

२) तांत्रिक सहायक - १ पद

३) कर सहायक - ४६८ पदे

गृह विभाग -

१) पोलीस उपनिरीक्षक - ३७४ पदे,

२) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - ६ पदे

महसूल व वन विभाग - दुय्यम निबंधक (श्रेणी -१) किंवा मुद्रांक निरीक्षक - ४९ पदे

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये - लिपिक टंकलेखक - ७०३४ पदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com