​​MPSC राज्य सेवा प्रीलिम्स Answer Key जाहीर, असे करा डाउनलोड

MPSC राज्यसेवा परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे.
mpsc state services prelims answer key
mpsc state services prelims answer keyesakal
Updated on
Summary

MPSC राज्यसेवा परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे.

एमपीएससी ​​(MPSC) राज्यसेवा परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी राज्यसेवा प्राथमिक Answer Key जाहीर केली आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार एमपीएससी mpsc.gov.in ऑफिशियल साइटद्वारे Answer Key तपासू शकतात. हे Answer Key पेपर 1 आणि पेपर 2 चे आहेत.

mpsc state services prelims answer key
MPSC : तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 23 जानेवारी 2022 रोजी ही परीक्षा घेण्यात आली. अर्ज प्रक्रिया 10 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू झाली आणि 1 जानेवारी 2022 रोजी संपली. भरती मोहिमेत 290 पदे भरण्यात येणार आहेत. प्रिलिम्सचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. जे उमेदवार प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण होतील ते मुख्य परीक्षेत बसण्यास पात्र असतील.

या दिवशी होणार मुख्य परीक्षा

माहितीनुसार, मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी होणार आहे.

mpsc state services prelims answer key
''भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी MPSC ॲक्शन मोडमध्ये ''

एमपीएससी राज्य सेवेची Answer Key अशी करा डाउनलोड

- उमेदवारांनी प्रथम एमपीएससी mpsc.gov.in अधिकृत स्थळाला भेट द्यावी.

- आता उमेदवारांनी होम पेजवर उपलब्ध एमपीएससी राज्यसेवा प्राथमिक Answer Key 2022 च्या लिंकवर क्लिक करावे.

- त्यानंतर उपलब्ध पेपर 1 आणि पेपर 2 लिंकवर क्लिक करा.

- आता एक नवीन पीडीएफ फाईल (PDF File) उघडेल जिथे उमेदवार त्यांची उत्तरे तपासू शकतील.

- उमेदवार एकदा Answer Key तपासल्यानंतर, फाईल डाउनलोड करू शकतात.

- उमेदवार त्यांच्या गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी प्रिंट ही करु शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com