Mukesh Ambani Success Tips : आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर मुकेश अंबानींकडून शिका या 5 गोष्टी

5 Things To Learn From MUkesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या या यशामागे त्यांचे समर्पण, कठोर परिश्रम आणि कार्य हेच रहस्य आहे.
Mukesh Ambani Success Tips
Mukesh Ambani Success Tipsesakal

5 Things To Learn From MUkesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या या यशामागे त्यांचे समर्पण, कठोर परिश्रम आणि कार्य हेच रहस्य आहे. वडिल धीरूभाई अंबानींच्या मृत्यूनंतर सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्यावर त्यांनी ती चांगल्या प्रकारे सांभाळली. आज ते ज्या स्थानावर आहेत, त्याचे जगभरात कौतुक होत आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असणारे मुकेश अंबानी यांचे व्यक्तीमत्व इतके कणखर आहे की, त्यांच्याकडू शिकले पाहीजे. त्यांच्या यशामागे कारणीभूत असणारे हे गुण कोणते जाणून घेऊया.

सकारात्मकता

तुम्हीही अंबानींप्रमाणे सकारात्मक होऊन पुढे चालत रहावे. अंबानी नेहमी सकारात्मक दिसतात. आणि हाच त्यांचा सर्वात मोठा गुण मानला जातो. म्हणूनच परीस्थिती कशीही असली तरी सकारात्मकता कायम ठेवा.

शिस्त

मुकेश अंबानी हे शिस्तप्रिय आहेत. त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही, त्यांना हवे असल्यास ते घरात राहूनही काम करू शकतात. पण ते कार्यालयात जाऊन उशिरापर्यंत थांबून काम पूर्ण करतात, असे सांगतात. ते आपल्या कामाबद्दल किती गंभीर आहेत आणि सतत मेहनत करताना दिसून येतं. यश मिळवण्यासाठी आणि मजबूत व्यक्तीमत्व मिळवण्यासाठी शिस्तबद्ध कसे असावे हे समजून घेणं फार महत्वाचे आहे.

Mukesh Ambani Success Tips
Success Story : पोलिस झाले, आता फौजदार व्हायचे; एरंडगावच्या पूनम पडवळचा निर्धार! लोहमार्ग पोलिसात निवड

जबाबदारीची जाणीव

असं म्हटलं जातं की, मुकेश अंबानी यांनी एमबीएचे शिक्षण अर्धवट सोडले आणि वडिलांचा व्यवसाय हाती घेतला. मुकेश यावेळी स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत होते, पण वडिलांचे म्हणणे टाळत ते भारतात परतले. त्यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला. सर्वप्रथम आपण आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत हे समजून घेतलं पाहिजे.

चांगला श्रोता व्हा

बिझनेसचे बादशाह मुकेश अंबानी यांच्याबाबत असं मानलं जातं की, ते कमी बोलतात आणि जास्त ऐकतात. कणखर व्यक्तीमत्व असेलल्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जेवढे आवश्यक आहे तेवढेच बोलतात. व्यक्तीमत्व मजबूत करण्यासाठी नेहमी गांभीर्याने ऐका आणि मर्यादित बोला.

Mukesh Ambani Success Tips
Succes : यश मिळवण्यासाठी या गोष्टी नक्की करा

ध्येय ठरवा

मुकेश अंबानींसाठी असं म्हटलं जातं की, ध्येय निश्चित करून पुढे जातात. अनेक वेळा लोक कोणतेही ध्येय न ठेवता काम करतात आणि चुटकीसरशी यश शोधत असतात. असं होणे शक्य नाही. सर्वात आधी आपलं लक्ष्य निश्चित करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com