Success Story : पोलिस झाले, आता फौजदार व्हायचे; एरंडगावच्या पूनम पडवळचा निर्धार! लोहमार्ग पोलिसात निवड

Poonam Padval
Poonam Padvalesakal

Success Story : मनात दुर्दम्य इच्छा शक्ती आणि ठाम निर्धार असेल तर अनेक अडचणींवर मात करत यशाचे शिखर गाठता येते. येथील विवाहिता पूनम पडवळ हिने हे दाखवून दिले आहे.

नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत ती महिलांमध्ये प्रथम आल्याने तिची पुणे लोहमार्ग पोलिसात निवड झाली आहे. तिच्या या यशाने या पदास गवसणी घातली आहे. (Success Story determination of Poonam Padval of Erandgaon Selection in Railway Police nashik news)

येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात कला शाखेत शिक्षण घेऊन पुढे पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या पूनमने पोलिस दलात जाण्यासाठी सुरवातीपासूनच प्रयत्न केले होते. निराश न होता गेली तीन वर्षे ती यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करीत होती.

पती संजय पडवळ महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलात नोकरीस आहेत. शेतकरी असलेले वडील अशोक खकाळे, भाऊ संतोष खकाळे, सासरे सुरेश पडवळ यांचे भक्कम पाठबळ तिला मिळाले. अपार कष्ट, सरावातील सातत्य, अचूक अभ्यास तसेच महात्मा फुले अभ्यासिका व सक्सेस करिअर अकॅडमीमध्ये मैदानी व लेखी परीक्षेची तिने तयारी केली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Poonam Padval
Nashik News : दुसऱ्यास ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; सिडको कार्यालयात मुदतबाह्य अग्निशमन सिलिंडर

मेरीटमध्ये महिलांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत पोलिस दलात भरती झाली आहे. पंकज वाडेकर, समाधान जमधडे, आदित्य कातकडे, सचिन झुरांगे, सोमनाथ खळे, अमित कलगुंडे आदींचे मार्गदर्शन लाभले. उज्ज्वल भविष्यासाठी प्रचंड त्याग व मेहनत, स्वतःचा संसार सांभाळून पोलिस भरतीच्या कठीण परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याने पूनमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

"माझ्या अंगावरही खाकी वर्दी असावी यासाठी पतींचे सतत प्रोत्साहन असायचे. घरच्यांसह सर्वांनी पाठबळ दिले. निराश न होता सतत मेहनत केली. मेहनतीने फळ मिळतेच, पुढे फौजदार होण्याचा मानस आहे." -पूनम पडवळ, एरंडगाव.

Poonam Padval
Akshay Tritiya : मुद्रणालयातर्फे सोन्या-चांदीची नाणी सर्वांसाठी उपलब्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com