पीएचडीसाठी प्रवेश नाकारल्याने विद्यापीठाविरोधात न्यायालयात याचिका | Mumbai University | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai High Court

पीएचडीसाठी प्रवेश नाकारल्याने विद्यापीठाविरोधात न्यायालयात याचिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पीएचडी प्रवेश (PHD Admission) परीक्षेत शंभरपैकी ७४ गुण मिळवूनही मुंबई विद्यापीठाने (Mumbai university) प्रवेश नाकारल्याने याविरोधात वकील राजेश्वर पांचाळ (rajeshwar panchal) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) याचिका (petition) केली आहे. पांचाळ यांनी एल. एल. एम. परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे.

हेही वाचा: कल्याणात जुगार अड्ड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाची धडक कारवाई

ओबीसी प्रवर्गातील असल्यामुळे त्यांना गुणांमध्ये पाच टक्के सूट आहे; मात्र त्यांचे यासंबंधीचे प्रमाणपत्र मार्चमध्ये रद्द झाल्यामुळे त्यांना विद्यापीठाने पीएचडीसाठी प्रवेश नाकारला आहे. विद्यापीठात अर्ज दाखल केला तेव्हा प्रमाणपत्र लागू होते. त्यामुळे विद्यापीठाने ती प्रक्रिया ग्राह्य धरावी, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. गुरुवारी यावर न्या. आर. डी. धनुका यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने प्रवेश नाकारल्यामुळे माझ्या मूलभूत अधिकारांवर आक्रमण होत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

loading image
go to top