Pune School News : विद्यार्थ्यांचा प्रश्न; सांगा आम्ही कसे शिकायचे?

शाळेतील शिक्षक पंधरा दिवसांपासून गायब; शिक्षक नसल्याने ३०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर...
Municipal School late Vastad Haribhau Pokle Primary School teacher absent education of 300 students
Municipal School late Vastad Haribhau Pokle Primary School teacher absent education of 300 studentssakal

धायरी : नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना मागील १० दिवसांपासून शिकविण्यासाठी शिक्षकच येत नाहीत. मनपा शाळा कै. वस्ताद हरिभाऊ पोकळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सांगा आम्ही कसे शिकायचे? असा प्रश्न विचारत आहेत. शिक्षक नसल्याने ३०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर वर आला आहे. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात वास्तव पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मनपा शिक्षक विभाग जोमात विद्यार्थी मात्र कोमात असे चित्र आहे.

शाळा सुरू होऊन आता दहा दिवस झाले आहेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला निकालानंतर शनिवारी देण्यात आला. कारण एसएससी बोर्डातून निकाल आणण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नव्हते.

नववी आणि दहावीच्या महत्वाच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास सुरू झालेला नाही. महापालिका शाळांतील सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती खासगी शिकवण्यांची भरमसाठ फी भरण्याची ऐपत नसते. त्यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

Municipal School late Vastad Haribhau Pokle Primary School teacher absent education of 300 students
School Opening : अन...शिक्षक नसल्याने बंद शाळा पुन्हा पूर्ववत झाल्या!

हरिभाऊ पोकळे प्राथमिक शाळेत पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाने ६ शिक्षकांना नियुक्ती दिली आहे. मात्र चारच शिक्षक उपस्थित झाले आहेत. त्यातील  दोन शिक्षक परत आले नसल्याने सध्या नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोनच शिक्षक उपलब्ध आहेत. त्यामुळे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी अजूनही पुस्तकाचे पानही उघडले नसल्याचे दिसून येते.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती बरी आहे. ८ वी पर्यंतचे शिक्षण अनुदानित असल्याने शिक्षकांसह काही सुविधा उपलब्ध केल्या जातात. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वारजे येथील "श्रीशैल्य मल्लिकार्जुन एज्युकेशन ट्रस्ट वारजे, पुणे

Municipal School late Vastad Haribhau Pokle Primary School teacher absent education of 300 students
Ashram Schools : आश्रमशाळांना दोन वर्षांत स्वमालकीची इमारत - डॉ. विजयकुमार गावित

अध्यक्ष श्री. एम.एम.नांवदे संस्थेतर्फे शिक्षकांची भरती केली जात होती. या वर्षी पूर्वीच्या सहा शिक्षकांचे काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे नवीन शिक्षक त्वरित उपलब्ध होत नाहीत. पालिकेनेच विनाअनुदानित संस्थेला याबाबत अधिकार दिल्याने सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,असे सांगितले जाते.

 शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांमध्ये बेशिस्त वातावरण आहे. शनिवारी विद्यार्थीनींनी बाकांवर उभे राहत हिंदी चित्रपटातील गाणी गात एकच गोंधळ घातला. अन्य वर्गांची जबाबदारी असलेल्या शिक्षकांनी याकडे लक्षही दिले नाही. कामाचा ताण असलेल्या शिक्षकांनी सुध्दा आत व्यावसायिक तत्त्वावर काम सुरू केल्यामुळे शिक्षकांचा पुर्वीचा दबदबा पालिका शाळांमध्ये राहिलेला नाही.

Municipal School late Vastad Haribhau Pokle Primary School teacher absent education of 300 students
English School Admission : इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 30 जून पर्यंत मुदत

आम्ही गरीब घरातील मुली आहोत खाजगी शाळा परवडत नाही म्हणून आम्ही मनपा शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतो परंतु सरकारी शाळेत शाळा सुरू झाल्यापासून अद्याप शिक्षक नसल्याने आमचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होते आहे.

-प्रतीक्षा पवार, विद्यार्थ्यांनी १०वी

शाळा सुरू होऊन दहा पंधरा दिवस झाले तरी शाळेत शिक्षक नसल्याने मुलांना शिकवण्यास सुरुवात झाली नसून मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधीनी लक्ष देणे गरजेचे आहे.आमचेकडे पैसे नसल्याने आम्ही खाजगी शाळेत मुलांना घालू शकत नाही.सरकारी शाळेकडून आम्हाला अपेक्षा आहेत.

-पुष्पा पवार-पालक

Municipal School late Vastad Haribhau Pokle Primary School teacher absent education of 300 students
Educational Policy : शिक्षणाचा हक्क कायद्यात सुधारणा! आता पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा

सांगा तुम्हीच आता आम्ही दहावीत शिक्षकांनी शिकवले नाही तर  पास कसे होणार.शिक्षक फोनवर बोलत बसतात आणि आम्हाला वर्गात आलोच म्हणतात. आमचे काय होणार पंधरा दिवस होऊन गेले शाळा सुरू होऊन आमचे दहावीचे वर्ष आहे.

-अभिनव लोणारे-विद्यार्थी १०वी.

संबंधित शाळेत किती शिक्षक आहे .तसेच सहाय्यक प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्फत शाळेची तपासणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. शिक्षकांनी शिकवण्यासाठी का?सुरुवात केली नाही त्यांची चौकशी केली जाईल.

राजीव नंदकर-उपयुक्त ,शिक्षण विभाग प्रशिक्षण विभाग ,मनपा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com