

JEE NEET Students
sakal
नागपूर : डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्रात (बार्टी) कार्यरत कंत्राटी प्रकल्प व्यवस्थापक विद्यार्थ्यांना नाहक त्रास देण्यात येत असून बार्टीद्वारे सुरू असलेल्या जेईई-नीट विद्यार्थ्यांचे मागील तीन महिन्याचे विद्यावेतन रोखले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. विद्यावेतन रोखल्यामुळे विद्यार्थ्यापुढे अडचण निर्माण होत आहे, असे बार्टीचे महासंचालकांना केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.