
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या शैक्षणिक सत्रासाठी विविध विभागांमध्ये ११० कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची निवड करण्यात येणार आहे. या पदांसाठी ५६८ उमेदवारांनी अर्ज केले असून सोमवारपासून त्यासाठी मुलाखती सुरू होणार आहे. २८ जुलै ते एक ऑगस्ट या दरम्यान चार दिवस या मुलाखती चालणार असून त्यातून कंत्राटी प्राध्यापकांची निवड करण्यात येणार आहे.