संवाद : सौंदर्यशास्त्रावर आधारित करिअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beauty

सुंदर दिसण्याचा ट्रेंड आजकाल पाहण्यास मिळत आहे. सौंदर्य खुलविण्यासाठी अस्थेटिक मेडिसिनचा (सौंदर्य चिकित्सा) वापर नॉन-सर्जिकल कॉस्मेटिक प्रक्रियांमध्ये केला जातो.

संवाद : सौंदर्यशास्त्रावर आधारित करिअर

- नंदन गिजरे

सुंदर दिसण्याचा ट्रेंड आजकाल पाहण्यास मिळत आहे. सौंदर्य खुलविण्यासाठी अस्थेटिक मेडिसिनचा (सौंदर्य चिकित्सा) वापर नॉन-सर्जिकल कॉस्मेटिक प्रक्रियांमध्ये केला जातो. वय लपविण्यासाठी त्वचा उजळ करणे, केस गळती तसेच अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे अशा प्रकारच्या उपचारांचा समावेश अस्थेटिक मेडिसिनमध्ये होतो. हे क्षेत्र प्रचंड वेगाने विस्तारत आहे. परंतु योग्य कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांचा अनेक क्लिनिकमध्ये अभाव आहे. या क्षेत्रात भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सध्या रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, योग्य कौशल्य असलेल्या मनुष्यबळाचा अभाव हे या उद्योगक्षेत्रासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. अस्थेटिक मेडिसिन या क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्रामुख्याने तीन श्रेणीत आहेत.

या क्षेत्रातील रोजगाराच्या पहिल्या श्रेणीत, डॉक्टर रुग्णांना सल्ला देऊ शकतात आणि उपचार करू शकतात. बोटॉक्स आणि फिलर्स, केसांचे प्रत्यारोपण, इत्यादी उपचारांसाठी विशेष शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. परंतु इतर अनेक उपचार जसे की केमिकल पील्स, एचआयएफयू, एमडीए, लेझरद्वारे केस काढणे, त्वचेवरील टॅटू काढणे, पीआरपी, मेसोथेरपी. विशेष प्रशिक्षण संस्थांद्वारे या क्षेत्राशी निगडित आयोजित केलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे डॉक्टरांना नोकरी मिळण्याची चांगली संधी उपलब्ध होत आहे. परकीय भाषा किंवा इंग्रजीचे संभाषण कौशल्य असल्यास असे उमेदवार परदेशातही नोकरीसाठी अर्ज दाखल करू शकतात.

दुसऱ्या श्रेणीत अवैद्यकीय प्रकारात मोडणारे थेरेपिस्ट काम करू शकतात. थेरेपिस्टला विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता असते, त्यानंतर ते त्यांचे कार्य पार पाडण्यासाठी डॉक्टरांच्या हाताखाली काम करू शकतात.

अस्थेटिक मेडिसिनचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये या थेरेपिस्टसाठी विशेष अभ्यासक्रम उपलब्ध असतात. बहुतेक दवाखान्यांना प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी या थेरेपिस्टची आवश्यकता असते, जेणेकरून डॉक्टर रुग्णांना सल्ला देण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करू शकतील. या क्षेत्रातील तिसरी श्रेणी म्हणजे सहाय्यक कर्मचारी. ते या क्लिनिकमध्ये प्रशासकीय काम, विक्री आणि इतर कामकाज करतात. अस्थेटिक मेडिसिनची विक्री हे एक विशेष क्षेत्र आहे, वितरण करणारे किंवा फ्रंट डेस्कवर काम करणारे कर्मचारी चाणाक्ष आणि नीटनेटके असणे आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही, परंतु त्यांच्याकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि या दवाखान्यांमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांची चांगली जाण असणे आवश्यक आहे.

थोडक्यात, अस्थेटिक मेडिसिनमध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. डॉक्टर तसेच नॉन-डॉक्टर यांना या क्षेत्रात रोजगारासाठी चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करू इच्छित असाल, तर जवळील सौंदर्यविषयक औषध, कॉस्मेटोलॉजी आणि ट्रायकोलॉजीचे विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांसोबत संपर्क साधावा.

(लेखक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्मेटॉलॉजी, अस्थेटिक अँड न्यूट्रिशनचे संस्थापक, संचालक आहेत)

Web Title: Nandan Gijare Writes Career Based On Beauty

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :beautyeducationjobCareer
go to top