संवाद : सौंदर्यचिकित्सा क्षेत्र : नोकरी की व्यवसाय?

वेगाने विस्तारणाऱ्या कौशल्याधिष्ठीत सौंदर्यशास्त्रातल्या व्यावसायिक आणि नोकरीच्या संधींविषयी आपण अधिक जाणून घेऊया.
beauty Aesthetics
beauty Aestheticssakal
Summary

वेगाने विस्तारणाऱ्या कौशल्याधिष्ठीत सौंदर्यशास्त्रातल्या व्यावसायिक आणि नोकरीच्या संधींविषयी आपण अधिक जाणून घेऊया.

- नंदन गिजरे

वेगाने विस्तारणाऱ्या कौशल्याधिष्ठीत सौंदर्यशास्त्रातल्या व्यावसायिक आणि नोकरीच्या संधींविषयी आपण अधिक जाणून घेऊया. कोरोना संक्रमणानंतर सगळ्यात लवकर उभारी घेतलेले क्षेत्र सौंदर्यशास्त्राचे आहे. बाकी व्यवसाय अजूनही चाचपडत आहेत, किंबहुना सौंदर्यक्षेत्र हे इथून पुढे मानवी गरज बनणार आहे यात शंकाच नाही.

सौंदर्यशास्त्र ही कला पुरातन असून कालपरत्वे त्यात आता उपचार चिकित्सा जोडली गेली आहे. याचे फायदे ग्राहकांसह क्षेत्रातील व्यावसायिक आणि त्वचा, सौंदर्य तज्ज्ञ यांनादेखील नवनवीन अमर्याद संधी उपलब्ध करून देणारे ठरत आहेत. सध्याच्या मीडिया क्षेत्रातील क्रांतीच्या काळात जिथे नवीन आव्हाने पेलावी लागत आहेत, तिथेच स्वतःच्या राहणीमानाविषयी जागरूकता, व्यक्तिमत्त्व विकास, चेहरेपट्टी इत्यादी गोष्टीचे महत्त्व स्पर्धेमध्ये प्रत्येकाला पुढे नेण्यासाठी आवश्यक ठरत आहेत. चांगले आणि आकर्षक दिसणे हे गरजेचे बनलेले आहे. त्यासाठी लागणारी आर्थिक खर्चाची बाब एक तरतूद म्हणून ठेवणे ही निकड होत आहे.

उपलब्ध संधी आणि पर्याय

या क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा उदयोन्मुख सौंदर्य शास्त्र व्यवसायिकांना सौंदर्योपचाराचे कोर्सेस संधीचे सोने करून देणारे ठरत आहेत. यात प्रामुख्याने नोकरीविषयक आणि व्यवसाय संबंधी पुढील तीन पर्यायांचे विश्लेषण पाहू.

  • आपण सौंदर्यतज्ज्ञ अथवा त्वचारोगतज्ज्ञ आणि संबंधित शल्यविशारद असल्यास, सुरुवातीला ठराविक आर्थिक भांडवल जमा करून स्वतःचे क्लिनिक सुरू करू शकता. यासाठीची पूर्व तयारी व आर्थिक नियोजन असल्यास त्याचप्रमाणे आपल्यातील स्वयंरोजगार क्षमता तपासून स्वतंत्र व्यवसाय उभारू शकता. हा व्यवसाय संधींचे अमर्याद स्रोत निर्माण करणारा तसेच काही कालावधीत आपल्याला आर्थिक संपन्नता व स्थैर्य देणारा ठरू शकतो.

  • आपल्याला सावधपणे पावले टाकायची असल्यास नोकरीच्या अनेक संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. केवळ काही वर्षातच आपण एक उच्च पगाराची नोकरी या क्षेत्रात मिळवू शकता. अनुभव वाढत जाईल त्याप्रमाणे भरपूर पगाराच्या नोकरीच्या संधी खुल्या होत जातील. किंबहुना इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याने स्वतःचे सौंदर्यचिकित्सा केंद्र सुरू करण्याबाबत आत्मविश्वास वाटू शकेल.

  • या क्षेत्रात वैद्यकीय पार्श्वभूमी नसतानाही आवड म्हणून काम करतात किंवा अनुभवी व सौंदर्य व्यावसायिक अथवा थेरपिस्ट आहेत, अशांनादेखील या सौंदर्यचिकित्सक म्हणून व्यवसाय करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. असे व्यावसायिक शल्यविशारदांच्या व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आपला व्यवसाय यशस्वी आणि ग्राहकाभिमुख बनवू शकतात.

नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संधी सौंदर्यचिकित्सा हे क्षेत्र देत आहे. यात प्रामुख्याने त्वचेचा आणि चेहऱ्याचा कायापालट करणे, त्वचा उजळवणे, तरुण दिसण्यासाठीचे आवश्यक उपचार, केसगळती थांबवणे तसेच अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे आणि इत्यादी गोष्टीचा अंतर्भाव आहे.

नजीकच्या काळात अस्थेटिक मेडिसिन म्हणजेच सौंदर्योपचार आणि सौंदर्यचिकित्सा हे वैद्यकीय व बिगरवैद्यकीय लोकांसाठी समृद्धीची लाट घेऊन येणारे क्षेत्र ठरणार आहे हे नक्की. केवळ नोकरी न करता स्वतंत्रपणे व्यवसाय करण्याचे स्वप्न उरात बाळगणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.

(लेखक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्मेटोलॉजी, अस्थेटिक अँड न्यूट्रिशनचे संस्थापक संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com