UPSCच्या भू-वैज्ञानिक परिक्षेत नाशिकच्या अथर्व पवारचे यश

UPSCच्या भू-वैज्ञानिक परिक्षेत नाशिकच्या अथर्व पवारचे यश
SYSTEM

नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या भू-वैज्ञानिक परीक्षेमध्ये सिडकोतील रहिवासी अथर्व पवार याने घवघवीत यश संपादन केले. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात अथर्वने गुणवत्ता यादीत आठवे स्थान प्राप्त केले.

त्याची जल शक्ती मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत केंद्रीय भू-जलबोर्डमध्ये वैज्ञानिक-बी (ग्रुप ए) या पदावर नियुक्ती झाली. अथर्वचे प्रारंभिक शिक्षण सेंट फ्रांसिस हायस्कूल (राणे नगर) येथे झाले. त्यानंतर अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादच्या एसपीआयमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण केटीएचएम कॉलेज नाशिकमधून झाले. तसेच सागर युनिवर्सिटी मध्यप्रदेश येथून एम.टेक (अप्लाइड जिओलॉजी) ची पदवी प्राप्त केली. अथर्वने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले.

UPSCच्या भू-वैज्ञानिक परिक्षेत नाशिकच्या अथर्व पवारचे यश
लग्नात नवरीचे पाहुण्यांना भन्नाट गिफ्ट, मित्रपरिवारांनी ठोकला सलाम!
UPSCच्या भू-वैज्ञानिक परिक्षेत नाशिकच्या अथर्व पवारचे यश
बॅंक ऑफ बडोदामध्ये आयटी प्रोफेशनल्सची भरती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com