NTPC recruitment 2022 | NTPC मध्ये भरती! 90 हजारांपर्यंत पगार;'या' तारखेपूर्वी करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NTPC recruitment 2022 Notification

विविध कार्यकारी पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

NTPC मध्ये भरती! 90 हजारांपर्यंत पगार;'या' तारखेपूर्वी करा अर्ज

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (NTPC) विविध कार्यकारी पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार Careers.ntpc.co.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 8 एप्रिलच्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत 55 कार्यकारी पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह (Combined Cycle Power Plant) चे 50 पद, एक्झिक्युटिव्ह (Operations - Power Trending)चे 4 पद आणि एक्झिक्युटिव्ह (Business Development Power Trading) चे 1 पद निश्चित करण्यात आले आहे. (NTPC recruitment 2022 Notification)

हेही वाचा: Indian Navy Recruitment 2022: नौदलात 12वी पाससाठी बंपर भरती, आज शेवटचा दिवस

महत्त्वाच्या तारखा

- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख- 25 मार्च 2022

- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 8 एप्रिल 2022

शैक्षणिक पात्रता

- एक्झिक्युटिव्ह (Combined Cycle Power Plant)) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगमध्ये किमान 60 टक्के गुणांसह पदवी तसेच कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

- एक्झिक्युटिव्ह (Operations - Power Trending) या पदांसाठी उमेदवारांना इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 60 टक्के गुणांसह पदवी आणि संबंधित क्षेत्रातील कामाचा तीन वर्षांचा अनुभव मागितला आहे.

- एक्झिक्युटिव्ह (Business Development Power Trading) साठी 60 टक्के गुण असलेल्या उमेदवारांना इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदवीसह तीन वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

हेही वाचा: रेल्वेत भरतीसाठी नवी अधिसूचना! दोन हजारांपेक्षा जास्त पदांची भरती होणार

वयाची अट

- या सर्व पदांवर अर्ज करण्याची वयोमर्यादा 35 वर्षे असून या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 90 हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.

जाणून घ्या या भरतीसाठी उमेदवार कसे करू शकतात अर्ज

- सर्वात पहिल्यांदा उमेदवारांनी एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाइट http://www.ntpc.co.in भेट द्यावी.

- त्यानंतर करिअर पेजवर क्लिक करा.

- येथे उमेदवारांनी आपला अर्ज भरावा.

- त्यानंतर तुमची कागदपत्रे अपलोड करा.

- शेवटी, उमेदवाराने अर्ज शुल्क भरावे.

Web Title: National Thermal Power Corporation Jobs 2022 Apply

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top