esakal | नेव्हीमध्ये अधिकारी व्हायची संधी; जाणून घ्या कधी करु शकता अर्ज?
sakal

बोलून बातमी शोधा

नेव्हीमध्ये अधिकारी व्हायची संधी; जाणून घ्या कधी करु शकता अर्ज?

नेव्हीमध्ये अधिकारी व्हायची संधी; जाणून घ्या कधी करु शकता अर्ज?

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : जर तुम्ही भारतीय नौसेनामध्ये अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमचं हे स्वप्न लवकरचं पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण आज या लेखामधून आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत, ती तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण अशी ठरु शकते.

हेही वाचा: सर्वोत्तम 'Internship' दिल्यास जाॅबमध्ये हमखास संधी

अलिकडेच इंडियन नेव्हीमध्ये शॉर्ट सर्व्हीस कमिशनच्या आधारावर इंजिनिअर पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत 12 जूनपासून सुरु झाली आहे. ही मुदत 26 जूनपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी इच्छूक उमेदवार नेव्हीच्या अधिकृत वेबसाईट https://www.joinindiannavy.gov.in/ वर जाऊन भेट देऊ शकतात.

याशिवाय NDA/NA (2) 2021 Exam साठी देखील 9 जून रोजी नोटीफिकेशन काढण्यात आलं आहे. जर तुम्ही देखील सेना आणि नौसेना अकॅडेमीमध्ये अधिकारी होऊन देशाची सेवा करु इच्छित असाल तर NDA तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो. याबाबतची अधिक माहिती आपल्याला अधिकृत साईट https://upsc.gov.in/ वर मिळू शकते.

हेही वाचा: आर्मी ते NDA भरती; या आठवड्यातच अर्ज करु शकाल अशा जागांची माहिती

आता एका क्लिकवर होईल फ्री तयारी

तुम्ही जर कोणत्याही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तर मोफत ई-बुक घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला फक्त https://www.safalta.com/e-books या लिंकवर क्लिक करावं लागेल.

loading image