NCERT
NCERT sakal

NCERT ला मिळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची घोषणा

अभ्यासक्रमातून विज्ञानासंबंधीचे अनेक धडे वगळ्याप्रकरणी NCERT गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत आहे.
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (NCERT) अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची घोषणा केली. या परिषदेच्या ६३ व्या स्थापना दिवस कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. (NCERT gets deemed university status announces Dharmendra Pradhan)

प्रधान म्हणाले, NCERT पहिल्यापासूनच संशोधन आणि प्रशिक्षणाचं काम करत आहे. त्यामुळं हे देशातील महत्वाची अॅकॅडमी आहे. त्यामुळं याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. यानंतर आता देशभरातील क्षेत्रीय आणि राज्य शिक्षण परिषदा या NCERTच्या ऑफ कॅम्पसच्या स्वरुपात काम करणार आहेत. (Latest Marathi News)

NCERT
One Nation, One Election: "...आता वेळ आली आहे"; ‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबत अजितदादांनी स्पष्ट केली भूमिका

NCERT शालेय शिक्षण व्यवस्थेची थिंकटँक

NCERT ही देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेची एक थिंकटँक आहे. याद्वारे भारतातील शालेय शिक्षणासाठी पाठ्यपुस्तकं तयार करणारं सर्वोच्च संघटन आहे. याच NCERTद्वारे देशातील नवं शिक्षण धोरण लागू करण्यात येत आहे. याशिवाय या परिषद संशोधन, प्रशिक्षण, पाठ्यपुस्तकांचा विकास त्याचबरोबर शैक्षणिक सामुग्रीशी जोडलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com